Somnath Suryawanshi News : Saam tv
महाराष्ट्र

Somnath Suryawanshi : सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू, पोलिसच जबाबदार; पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Somnath Suryawanshi News : परभणी दंगलीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर पहिल्यापासूनच संशय व्यक्त होत होता. आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातही पोलिसांवर ठपका ठेवण्यात आलाय. पाहूया नेमकं काय म्हटलंय अहवालात या रिपोर्टमधून...

Girish Nikam

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात परभणीच्या नवामोंढ पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीना मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालातून सामोर आलंय. या अहवालात आणखी काय म्हटलंय ते पाहूया.....

सूर्यवंशींचा मृत्यू,पोलिसच दोषी

परभणीच्या नवामोंढा पोलिस ठाण्यात मारहाण

सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच

सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस जबाबदार

राज्य मानवाधिकार आयोगाकडून दखल

संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितलं

गेल्या 10 डिसेंबरला परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर 11 डिसेंबरला परभणी बंद दरम्यान शहरात दगडफेक, जाळपोळच्या घटना घडल्या. या प्रकरणी पोलीसांनी सोमनाथ सुर्यवंशींना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर 15 डिसेंबरला त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. सूर्यवंशीच्या मृत्यूवरुन विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता.दरम्यान, आपल्या मुलाच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या दोषी पोलिसांवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं केलीय.

न्यायदंडाधिकाऱ्यांच्या या अहवालामुळे विरोधक सरकारला घेरणार हे निश्चित.दुसरीकडे दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल होणार का ? की याची नोंद फक्त अहवालातच राहणार हे पाहणं महत्वाचं आहे. सरपंच संतोष देशमुखांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या ही दोन्ही संवेदनशील प्रकरणांनी राज्यातील पोलिस यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर आणि कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT