Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Heat Wave: राज्‍यात उष्‍णतेची लाट; सर्वत्र तापमान चाळीशी पार, परभणीत ४१ डिग्री सेल्शियसची नोंद

राज्‍यात उष्‍णतेची लाट; सर्वत्र तापमान चाळीशी पार, परभणीत ४१ डिग्री सेल्शियसची नोंद

राजेश काटकर

परभणी : मागील आठवड्यापासून राज्‍यात उष्‍णतेची लाट (Heat Wave) आली आहे. राज्‍यातील सर्वच शहरातील कमाल तापमान (Temperature) हे चाळीशी पार गेले आहे. परभणी शहर परिसरात देखील कालच्‍या तुलनेत कमाल तापमानात अंशाने वाढ होवून आज ४१ डिग्री इतकी नोंद वनामकृविच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने घेतली आहे. (Breaking Marathi News)

परभणी शहर परिसरात सोमवारी कमाल तापमान ४० अंश सेल्‍सीअस इतके होते. यात १ अंशाची वाढ झाली आह़े. शहर परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्याचे दिसून येत आहे. शहर परिसरात आज ४१ डिग्री एवढे तापमान नोंदविले असून मागील आठ ते पंधरा दिवसांपासून शहर परिसरात कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. सध्या दररोज वर्तविण्यात येणाऱ्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. अजून दोन दिवस ही स्थिती राहू शकते. त्यामुळे ऊन- सावलीचा खेळ अधूनमधून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात कमाल तापमानात वाढ झाल्याने जनजीवनावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत असल्याने शहरातील रस्त्यांवरील वर्दळ काही प्रमाणात कमी झाली आहे. एप्रिल महिन्यातच पारा अंशांवर चाळीस अंशावर गेल्याने पुढचा उन्हाळा त्रासदायक ठरणार आह़े..हया उन्हाचा परिणाम लहान मुले व वृध्दास जास्त होत आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आह़े.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

SCROLL FOR NEXT