Cotton Price News
Cotton Price News Saam tv
महाराष्ट्र

Cotton News: भाव नसल्याने घरात साठवून ठेवला कापूस; किडींच्‍या प्रादुर्भावाने आता आरोग्य धोक्यात

साम टिव्ही ब्युरो

परभणी : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत कापसाला भाव नसल्याने घरात साठवून ठेवला आहे. यामुळे आता आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. घरात साठवलेल्या कापसामुळे अंगावर गुदड्या येणे व असह्य खाज येऊन अंग लाल होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ह्याचा त्रास सहन करावा लागत असून कापूसाचा भाव तर वाढत नाही; पण दवाखान्यात शेतकऱ्यांला पैसे घालत आर्थिक फटका बसत आहे. (Tajya Batmya)

परभणी जिल्‍ह्यात खरीप हंगामात पावणेतीन लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण कापसावर असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्‍या. कापूस बाजारात आल्यावर सुरुवातीला ९५०० ते ९८०० रुपये क्विंटल भाव मिळाला. जसा जसा कापूस बाजारात आला व आवक वाढली. तसे व्यापाऱ्यांनी भाव पाडले. भाव कमी होत ७५०० ते ७८०० झाले व शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला.

अंगाला सुटतेय खाज

दिवसोंदिवस भाव वाढत नाहीत व शेतकऱ्यांच्या साठवलेल्या कापसाने नवीन आरोग्य समस्या निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कापसाच्या किडीने अंगावर गुदड्या, खरूज, अंग लाल होवून असह्य खाज सुटणे अश्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे आता दवाखान्यात पैसे खर्च करावे लागत आहेत. कापसाचा भाव वाढेल ह्या आशेवर शेतकऱ्यांना दवाखान्यात पैसे खर्च करावे लागत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शेतकरी जीवावर उदार होऊन कापसाच्या भाव वाढण्याची आशा बाळगून आह़े.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

Maharashtra Weather Forecast: पुणे, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

SCROLL FOR NEXT