Sangli News: H3N2 चे जिल्‍ह्यात आढळले पाच रुग्ण

H3N2 चे जिल्‍ह्यात आढळले पाच रुग्ण
H3N2 Virus
H3N2 VirusSaam tv
Published On

सांगली : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये H3N2 या स्वाईन फल्यूूच्या उपप्रकाराचे रुग्ण आढळत आहेत. तर सांगली (Sangli News) जिल्ह्यात पाच रुग्ण आढळून आले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात तीन आणि ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. (Live Marathi News)

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनानंतर H3N2 चा विळखा पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाने दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

H3N2 Virus
Jalgaon News: सेवानिवृत्तीला बाकी होते काहीच महिने; बीएसएफ जवानाला वीरमरण

तपासणी व उपचारासाठी स्वतंत्र कक्ष

आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून जिल्‍ह्यातील ६४ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३२० उपकेंद्राच्या ठिकाणी ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहे. या कक्षामध्ये रुग्णांच्या आरोग्य तपासणीसह H3N2 आजाराच्या निदानासाठी आरटीपीसीआर स्वॅब घेवून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडे पाठविले जात आहे. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या ठिकाणी या आजाराच्या उपचाराकरीता पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवणेत आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com