Parbhani civil hospital 
महाराष्ट्र

तिसऱ्या लाटेचा धोका..जिल्हा रुग्णालयात कोरोना नियमाकडे पाठ

तिसऱ्या लाटेचा धोका..जिल्हा रुग्णालयात कोरोना नियमाकडे पाठ

राजेश काटकर

परभणी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी जिल्हा रुग्णालयात कोरोना नियम रुग्ण व नातेवाईकांकडून फारसे गांभिर्याने पाळले जात नाही. यामुळे जिल्‍हा रुग्णालयातूनच तिसऱ्या लाटेचा धोका संभवला जात आहे. (parbhani-news-coronavirus-third-wave-back-to-the-corona-rule-in-the-civil-hospital)

जिल्‍हा रुग्णालयात येणारे रूग्‍ण व त्‍यांचे नातेवाईक यांच्‍याकडून फिजिकल डिस्‍टसिंगकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच रुग्ण व नातेवाईक मास्क न घालत रूग्णालयात वावरत असून याकडे रूग्णालय प्रशासन देखील गांभीर्याने पाहत नाही. यामुळे कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अगोदरच आजारांची साथ

परभणी जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण व नातेवाईक उपचारासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. त्यात डेंग्‍यू, मलेरिया, चिकनगुनीया या आजारांची साथ पसरली आहे. यामुळे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हजारोच्या संख्येने रुग्ण व नातेवाईक रूग्णालयात येत आहेत.

मग तिसरी लाट रूग्णालयातूनच?

तिसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे. तर दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयात कोरोना नियमाचा फज्जा उडविला जात आहे. तिसऱ्या लाटेला रोखणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्ण नातेवाईक सोशल डिस्‍टसिंग, मास्क न घालता रुग्णालयात वावरत आहेत. याकडे रूग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असून बघ्यांची भूमिका घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : अवकाळी पावसाने राज्याला झोडपलं; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; कुठे,कसं असेल हवामान वाचा

Maharashtra Live News Update: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी

Curry Leaves Water For Weight Loss: रोज सकाळी प्या 'कढीपत्त्याचं पाणी', वजन होईल भरभर कमी

Namo Shetkari Yojana: खुशखबर! राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट ₹२००० जमा होणार ; तारीख आली समोर

Petrol Price : पेट्रोलच्या किंमती वाढल्या, गॅस सिलिंडरनंतर पॉवर पेट्रोल महागलं, वाचा पुण्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT