Parbhani Purna Taluka Farmers News Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News: रात्री मोटार चालू करण्यासाठी शेतात गेला अन् अनर्थ घडला; शेतकऱ्याच्या मृत्युने अख्खं गाव हळहळ

Parbhani Purna Taluka Farmers News: परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

राजेश काटकर

Parbhani Purna Taluka Farmers News: परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गावात मंगळवारी (२ मे) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. (Latest Marathi News)

भुजंग रामकिसन काळे (वय ३२ वर्षे) असं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. काळे यांच्या मृत्युमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांच्या मृत्युला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा काळे (Parbhani) गावात राहणारे भुजंग काळे हे अल्पभूधारक शेतकरी होते.

त्यांनी आपल्या शेतात ऊसाची लागवड केलेली होती. मात्र, महावितरण कंपनीकडून मिळणाऱ्या चक्राकार पध्दतीच्या वीज पुरवठ्यामुळे त्यांना ऊसाला पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत होते. मंगळवारी भुजंग यांनी आपल्या कुटुंबासोबत जेवण केले. मी शेतातून मोटार चालू करून येतो म्हणून ते रात्री ११ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. (Breaking Marathi News)

मात्र, शेतात मोटार सुरू करत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. भुजंग काळे यांचे धानोरा काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

त्यानंतर बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काळे यांच्या पश्चात वडील,पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भाऊ असा परिवार आहे. खरीप हंगामाने शेतकऱ्यांना पुरता दगा दिला. अतिवृष्टीमुळे लागवडीचा केलेला खर्चही निघाला नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी रात्री बेरात्री उरलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जात आहेत.

त्यातच मागील काही दिवसांपासून महावितरणने भारनियमन सुरू केले आहेत. दिवसा लाईट उपलब्ध नसल्याने भारनियमन सुरू असल्याने शेतकरी रात्री-बेरात्री जाऊन पिकाला पाणी देत आहेत. पाणी भरताना शेतकऱ्यांसमोर अनेक धोकेही आहेत. साप, विंचू, वन्यप्राण्यांकडून हल्ला होण्याची भीती सतत सतावत असते. त्यामुळे महावितरणने दिवसा लाईट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

SCROLL FOR NEXT