Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: चारा काढत असतांना हाती आला अजगर; ११ फुटांचा अजगर सर्पमित्राने पकडला

चारा काढत असतांना हाती आला अजगर; ११ फुटांचा अजगर सर्पमित्राने पकडला

राजेश काटकर

परभणी : शेतात जनावरांसाठी ठेवलेल्या कडब्याच्या गंजीमध्ये चारा काढायला गेले असता, हाती भाला (Parbhani) मोठा अजगर आढळून आला. शेतकऱ्याने लागलीच (Snake) सर्पमित्राला बोलावले असता या सर्पमित्राने मोठ्या शिताफीने ११ फूट लांबीचा अजगर पकडला. (Maharasthra News)

मागील काही महिन्यांपासून विविध जातींच्या सापाचा मानवी वस्तीसह शेतातील आकड्यावर वावर वाढल्याचे दिसून आले आहे. विशेषत: शेत आखाड्यावर अशा प्रकारच्या सापांचा अधिक प्रमाणात संचार आढळून आला आहे. या दरम्यान आज दुपारी तब्बल अकरा फूट लांबीचा अजगर जातीचा साप सर्पमित्रांनी पकडला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मौ. अकोली येथील विठ्ठल रोकडे यांच्या शेतातील आखाड्यावर जनावरांसाठी ठेवलेल्या कडब्याच्या गंजीमध्ये जनावरांचा चारा घेण्यासाठी गंजीकडे गेल्यानंतर त्यांना एक अकरा फूट लांबीचा व तब्बल सहा इंच आकाराचा अजगर जातीचा साप आढळून आला. 

अजगराला सोडले जंगलात 

त्याचवेळी त्यांनी जवळच असलेल्या ऋषिकेश रोकडे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ सर्पमित्र केरबा चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता काही वेळात सर्पमित्र चव्हाण यांनी त्या ठिकाणी येऊन मोठ्या शिताफिने या अजगराला पकडले. यानंतर शेतकऱ्यांना सापाच्या विविध जातीची माहिती दिली. या अजगराला पकडून इटोलीच्या घनदाट जंगलात सोडून देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड|VIDEO

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड

Health Care : जास्त प्रमाणात खजूर खाल्याने आरोग्यावर होतात 'हे' 5 गंभीर परिणाम; जाणून घ्या

Inhaled insulin: डायबेटीजग्रस्तांची इन्सुलिनच्या इंजेक्शनची कटकट संपणार; आता श्वासाद्वारे घेता येणार इन्सुलिन

किचनच्या फरशीवर असणारे हट्टी डाग चुटकीसरशी काढा

SCROLL FOR NEXT