Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा मृत्यू डीजेमुळे नाही; पोलीस अधीक्षकांनी सांगितले खरे कारण

Parbhani News : गणेश विसर्जन मिरवणूक सर्वत्र काढण्यात आली होती. यात अनेकांनी डीजे लावत मिरवणूक काढली होती. त्यानुसार परभणीच्या जिंतूर मध्ये देखील गणेश मिरवणुकीमध्ये डिजेवर लावण्यात आला होता

राजेश काटकर

परभणी : जिंतूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजात नाचताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर तरुणाचा मृत्यू डीजेमुळे नाही तर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान मृत्यूचे खरे कारण पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतर समजेल असे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी सांगितले. 

गणेश विसर्जन मिरवणूक सर्वत्र काढण्यात आली होती. यात अनेकांनी डीजे लावत मिरवणूक काढली होती. त्यानुसार परभणीच्या (Jintur) जिंतूर मध्ये देखील गणेश मिरवणुकीमध्ये डिजेवर लावण्यात आला होता. या मिरवणुकीत नाचतांना संदीप कदम (वय ३७) या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. तर गोविंद कदम, शुभम कदम व शिवाजी कदम हे तिघेजण डीजेच्या आवाजामुळे अस्वस्थ झाले होते. त्यांच्यावर (Parbhani) परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.  

जिंतूरमध्ये डीजे लावणाऱ्यावर गुन्हा दाखल 

सुप्रीम कोर्टाने डीजे आणि लेझर लाईट वापरण्यावर बंदी घातली असताना परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डीजे वापर झाला. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना विचारले असता जिल्ह्यात डीजेमुक्त गणेश उत्सव साजरा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर जिंतूर येथे डीजे लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून डीजे देखील जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. शिवाय डीजेमुळे या तरुणांचा मृत्यू झाला नसून मिरवणुकीत नाचताना मृत्यू झाल्याचं जिल्हा पोलीस प्रमुखानी दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT