Parbhani Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Parbhani Accident : भीषण अपघात; भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा जागीच करुण अंत

Parbhani Accident : दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन दोन्ही दुचाकीवरून तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या उड्डाण पुलावर घडली आहे. या घटनेनं काही काळ उड्डाण पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Prashant Patil

परभणी : दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन दोन्ही दुचाकीवरून तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या उड्डाण पुलावर घडली आहे. या घटनेनं काही काळ उड्डाण पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तातडीने मृतदेह रुग्णालयात पाठवून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली ज्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली. दोन्ही मृत तरुणांची ओळख पटविण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

पुण्यात अपघातांची मालिका

दरम्यान, पुणे शहरातील नवले पूल परिसरात पुन्हा एकदा अपघातांची मालिका पाहायला मिळाली आहे. तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका प्रकरणात महाविद्यालयातील तरुणाने दारूच्या नशेत गाडी चालवली आणि निष्पाप तरुणाचा जीव घेतला. मधल्या काळात अपघातांची मालिका थांबलेल्या नवले पूल परिसर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसतंय.

पहिला अपघात शनिवारी पहाटे साडेतीन वाजता झाला. शुभम भोसले या महाविद्यालयीन तरुणाने दारू पिऊन मर्सीडिज कार चालवली आणि त्या कारने धडक दिल्याने कुणाल हुशार या तरुणाचा बळी गेला. शुभम भोसले आणि त्याच्या चौघा मित्रांनी आधी हिंजवडी परिसरात दारु पार्टी केली. त्यानंतर ते पुणे बंगळुरु महामार्गावरुन कात्रजच्या बोगद्याच्या दिशेने गेलं.

परतताना वडगाव पुलावर किर्तनाचा कार्यक्रम उरकून घरी जाणाऱ्या कुणाल हुशार आणि प्रज्योत पुजारी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामधे कुणाल हुशारचा मृत्यू झाला. तर प्रज्योत पुजारी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : सुप्रिया सुळेंना जोरदार धक्का, निकटवर्तीयाने घेतलं कमळ; पुण्यातील 'या' २२ दिग्गजांचा भाजपात प्रवेश

Sweater Cleaning : स्वेटरवरील मळकट डाग होतील गायब; 'या' सोप्या टिप्सने वापरून कपडे दिसतील नव्यासारखे

Railway Ticket : रेल्वे प्रवासावेळी मोबाइलमधील तिकीट चालेल की नाही? रेल्वेने एका झटक्यात स्पष्ट केले, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Dhurandhar vs Avatar-Fire and Ash Collection : 'अवतार'च्या रिलीजनंतरही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' ची हवा, रणवीरच्या चित्रपटाने किती कोटी कमावले?

SCROLL FOR NEXT