Parbhani Crime Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Parbhani News : मृतदेह सापडल्याने घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असुन घटनास्थळी श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ञ व इतर पथके पोचले असुन घटनेचा पंचनामा केला जात असुन पोलीस पुढील तपास करत आहे

Rajesh Sonwane

विशाल शिंदे 
परभणी
: परभणी शहराच्या मध्यवस्तीच्या परिसरात एका चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आले. घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून घातपात झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

परभणी शहरातील अमेय नगर भागात एका चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. अमेय नगर भागात आज सकाळच्या सुमासार महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती नानलपेठ पोलीसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी मयताची ओळख पटवली आहे. शहरातील साखला प्लॉट परिसरात राहणारी असून गवळण निवृत्ती वाघमारे असे महिलेचे नाव आहे.  

घातपात केल्याचा संशय 

अमेय नगरातील खुल्या जागेत गवतामध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यात पोलिसांकडून महिलेच्या मृत्यू मागचे नेमके कारण काय? याचा शोध घेतल्या जात आहे. सदर महिलेला अमेय नगरात कोणी आणून टाकले या मागे काही घात पाताचा प्रकार आहे का? या विषयी तपास सुरु आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गवळण वाघमारे हि मृत महिला असून मयताची बहिण परभणीतील साखला प्लॉट भागात राहण्यास असुन तीने ओळख पटविली. माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोउपनी श्रीकांत नारमोड, पोलीस अंमलदार केजगीर यांचे पथक घटनास्थळी आले. श्वान पथक, ठसे पथकालाही पांचारण करण्यात आले. पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: मंदिरात या ६ वस्तू दान करा, घरात येईल सुख-समृद्धी

Maratha Reservation: ...तर त्या नेत्यांवर बहिष्कार टाकू, लक्ष्मण हाकेंच्या धमकीला ओमराजे निंबाळकरांचे उत्तर; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर

Palmistry: तुम्ही किती वर्ष जगणार? तुमच्या हातांवरील रेषांमध्ये दडलंय रहस्य, पाहा कसं पाहू शकता?

Ganpati Temple : गणेशोत्सवात गणपती मंदिरातील दान पेटीची चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

SCROLL FOR NEXT