Parbhani Crime Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Crime : किरकोळ कारणातून वाद; धारदार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू, एक गंभीर

Parbhani News : क्षुल्लक कारणातून उद्भवलेला वाद मारहाणीपर्यंत पोहचला. यानंतर धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले. यामध्ये अर्जून अब्दागिरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर लखन जाधव गंभीर जखमी झाले

Rajesh Sonwane

विशाल शिंदे 

परभणी : अगदी शुल्लक कारणातून वाद निर्माण होऊन हाणामारीपर्यंत पोहचत असतात. अशीच घटना परभणीच्या नांदखेडा गावात घडली असून गावात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीपर्यंत पोहचले. यातून धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आल्याने एका युवकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

परभणी शहराच्या जवळच असलेल्या नांदखेडा गावातील अर्जून अब्दागिरे (वय २०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान गावात अब्दागिरे आणि जाधव हे एकाच गल्लीत राहतात. तर ते दोघेजण एकमेकांचे नातेवाईक देखील आहेत. अब्दागिरे व जाधव या दोन्ही कुटुंबात काल टोकाचा वाद झाला. अत्यंत किरकोळ कारणावरून वाद सुरू झालेला वाद मारामारीपर्यंत पोहचला होता. एकमेकांना मारहाण करण्यात आली. 

एकमेकांवर केले शस्त्राने वार 

क्षुल्लक कारणातून उद्भवलेला वाद मारहाणीपर्यंत पोहचला. यानंतर धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले. यामध्ये अर्जून अब्दागिरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर लखन जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तसेच या हाणामारीत परिवारातील इतर ३ जण ही जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहे.

चार जण पोलिसांच्या ताब्यात 

घटना घडल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात ४ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक रवींद्रनाथ परदेशी यांनी नांदखेड्याला भेट दिली असुन या प्रकरणात स्वतः लक्ष ठेवून आहेत. तर या प्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

Hair Cut: नवदीचा 'बॉब' हेअरकट पुन्हा ट्रेंडमध्ये; पाहा तुमच्या चेहऱ्यानुसार कोणता कट दिसेल परफेक्ट

Kerala CM Oath Ceremoney : मोठी बातमी! केरळच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशन, दिग्ग्ज नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ

Cannes Festival-Ashok Saraf : 'कान्स'मध्ये मराठीचा डंका! अशोक मामांनी केली हटके एन्ट्री, निवेदिता सराफ यांच्या लूकने वेधले लक्ष | VIDEO

SCROLL FOR NEXT