जंगलात फिरणाऱ्या जोडप्याला ६ जणांनी घेरून तरुणीवर सामूहिक अत्याचार केला.
आरोपींनी अत्याचाराचा व्हिडिओ बनवत पीडितेकडून ५ हजार रुपये हिसकावले.
पोलिसांनी या घटनेत सामील सर्व सहा आरोपींना अटक केलीय.
परभणीच्या जिंतूर तालुक्यात एक संपाजनक घटना घडली आहे. एका तरुणीवर सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. जंगलात फिरायला आलेल्या जोडप्याला घेरत ६ जणांनी तरुणीवर अत्याचार केला, त्याचा व्हिडिओ बनवत तिच्याकडून त्यांनी ५ हजार रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींना अटक देखील केली आहे.
ही संतापजनक घटना १४ ऑक्टोबर रोजी घडली होती. १४ ऑक्टोबरला तरुण आणि तरुणी जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी मंदिर संस्थात इटोली शिवारातील जंगलात फिरायला आले होते. ते एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते, त्यावेळी तेथे ६ जण आले. या सहाजणांनी त्यांना घेरलं. तरुणाला पकडून ठेवत तरुणीवर अत्चाचार केला. अत्याचार करताना मुलीचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर मुलीकडे असलेल्या पाच हजार रुपये देखील त्यांनी हिसकावून घेतले.
एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते. यावेळी तिथे करण, शेषराव, साबेर, मुन्या, अर्जुन आणि लखन नावाचे व्यक्ती तेथे आले. यातील अर्जुन आणि लखन याने तरुणाला पकडून ठेवले. तर करण, शेषराव आणि साबेर या तिघांनी या मुलीवर अत्याचार केला. अत्याचार करत असताना त्यांनी व्हिडिओ सुद्धा बनवला. हा व्हिडिओ मुन्या नावाच्या व्यक्तीने काढला.
याप्रकरणी आता पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी त्यावर कारवाई केलीय आहे. पोलिसांनी आरोपींना अटकदेखील केली आहे. सुरुवातीला समजात बदमानी होईल या धाकाने मुलीने पोलिसांत तक्रार केली नव्हती. परंतु पोलिसांना अशी काही अनुचित घटना घडल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपींचा शोध घेतला.
याप्रकरणी माहिती देताना रवींद्र परदेशी पोलीस अधीक्षक म्हणाले, पीडित मुलगी घाबरलेली होती. त्यामुळे तिने तक्रार दिली नव्हती. मात्र गुपित माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिसांनी जलद गतीने तपास करत पीडितेला शोधलं तिची फिर्याद लिहून घेण्यात आली. त्या तक्रारीनुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार घडल्याची कुणकुण पोलिसांनी लागली आणि पोलिसांनी मोठ्या सतर्कतेने मुलीला मुलाला विश्वासात घेवून.या प्रकरणात जिंतूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ कलम ७०(१)१२६(१)३१०,माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६(इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि यातील अर्जुन दत्तराव बटकुले,शेख साबेर शेख सत्तार शेषराव दत्तराव शेवाळे यांच्यासह इतर तिघांनाही अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.