parbhani case  Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Case : आम्हाला न्याय मिळाला नाही तर...; परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

Parbhani Case update : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईंनी जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेन, अशा इशारा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दिला आहे.

डॉ. माधव सावरगावे

परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांना ज्ञान मिळावा, यासाठी आज गुरुवारी वंचिन बहुजन आघाडीने जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी माझ्या मुलाच्या आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीचा शिक्षा द्या, अशी मागणी सोमनाथ यांच्या आईने याआधीच केली आहे. आज विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सोमनाथ यांचे दोन्ही भाऊ आणि त्यांची आई जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. 'मला न्याय मिळाला नाही, तर मी आत्महत्या करेन, असा इशारा सोमनाथ यांच्या आईने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. '

सोमनाथ यांच्या आईंनी काय मागणी केली?

'तुम्ही जर मला न्याय दिला नाही तर, मी आत्महत्या करेन. माझा जवान मुलगा गेला आहे. मला आता राहून काय करायचं? माझ सुख सरकारनं हिसकावून घेतलं आहे. मला न्याय द्या. नाही तर मी आत्महत्या करेन, असा इशारा सोमनाथ यांच्या आईने परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देत असताना दिलाय. यामुळे एकच खळबळ माजली आहे.

सोमनाथ यांच्या आईंचा सरकारला इशारा

सोमनाथ यांच्या आईने दिलेला हा गर्भित इशारा प्रशासन किती गांभीर्याने घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर आंबेडकरी अनुयायींकडून मोठा आक्रोश केला होता. त्याप्रकरणी सोमनाथ सुर्यवंशी यांना अटक झाली होती. सोमनाथ सुर्यवंशी यांचा 15 जानेवारी रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून आंबेडकरी अनुयायींकडून सोमनाथ यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी आंदोलन उपोषण करीत मोर्चे काढले जात आहेत.

परभणीच्या घटनेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले काय म्हणाले होते?

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले होते की,' बीड प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. परभणीत कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. पोलिसांमुळे सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाचा अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

Diwali Lucky Rashi: दिवाळीत 'या' राशींची होणार चांदी, खिशा पैशांनी भरणार

SCROLL FOR NEXT