Monkey Attack Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: परभणीत माकडांच्या टोळीचा हैदोस... हल्ल्यामध्ये १०- १५ जण जखमी; गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

Parbhani Latest News: परभणीच्या सेलू तालुक्यातील देऊळगाव (गात) याठिकाणी माकडाच्या टोळीने उच्छाद मांडला आहे. आत्तापर्यंत दोन महिलांसह 10ते पंधरा जणांचा चावा घेतला असून गावात माकडांनी दहशत पसरवली आहे.

Gangappa Pujari

राजेंद्र काटकर, परभणी|ता. ४ एप्रिल २०२४

Parbhani Breaking News:

परभणीच्या सेलू तालुक्यातील देऊळगाव (गात) याठिकाणी माकडाच्या टोळीने उच्छाद मांडला आहे. आत्तापर्यंत दोन महिलांसह 10ते पंधरा जणांचा चावा घेतला असून गावात माकडांनी दहशत पसरवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेलू तालुक्यातील देऊळगाव (गात) याठिकाणी माकडांच्या टोळीने उच्छाद मांडला आहे. आत्तापर्यंत गावातील दोन महिलांसह १० ते १५ जणांचा चावा घेतला असून गावात माकडांनी दहशत पसरवली आहे. यामध्ये गावातील अनेक जण जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर गावात माकडांची मोठी दहशत पसरली आहे. गावात अघोषित संचारबंदी लागली आहे. रस्त्यावर एकटे बाहेर पडणे धोकादायक झाल्याने गावात महिला, लहान मुले, वयोवृध्द नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिकांना माकडांच्या टोळीने सळो की पळे करून सोडले आहे.

माकडाच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले असून संबंधित विभागाने तात्काळ माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली जात आहे. मात्र वनविभागाने अद्याप दखल घेतली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT