Beed News: मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला; गाडी अडवून बेदम मारहाण

Beed News: बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना काल रात्री घडली. या हल्ल्यात ज्ञानेश्वर खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
Beed Breaking News:
Beed Breaking News: Saamtv

Beed Breaking News:

बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना काल (बुधवार, ३ एप्रिल) सायंकाळी घडली. गाडी अडवून सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केली असून या हल्ल्यात ज्ञानेश्वर खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. (Crime News in Marathi)

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे काल (ता. ३ एप्रिल) बीडमधून म्हाळस जवळा या आपल्या गावाकडे जात होते. बीडपासून जवळच काही अंतरावर त्यांच्या गाडीला काही जणांनी हात करुन गाडी थांबवण्याचा इशारा केला. खांडे यांनी गाडी थांबवताच त्यांच्यावर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला चढवण्यात आला.

तसेच ज्ञानेश्वर खांडे यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामध्ये खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या हल्ल्या मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Beed Breaking News:
Maharashatra Loksabha: महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन; वडेट्टीवार, रोहित पवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या...

दरम्यान, कल्याणमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अविनाश धनाजी शिंदे आणि सॅमसंग डॅनियल अशी चोट्यांची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या दोघांविरोधात महाराष्ट्रसह इतर राज्यात विविध पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Breaking News:
Maharashtra Loksabha: वंचितचा काँग्रेसला परत 'दे धक्का'; रामटेकमधील बंडखोर उमेदवाराला पाठिंबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com