Maharashatra Loksabha: महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन; वडेट्टीवार, रोहित पवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

Maharashtra Politics : राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचा प्रचार सत्र केलं आहे. आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा प्रचार केला जात आहे. इंडिया आघाडीच्या वतीने विजय वडेवट्टीवार यांनी गडचिरोली-चिमूर येथील मतदारसंघात आपल्या उमेदवाराच्या प्रचार सभेत भाग घेत भाजपवर जोरदार टीका केलीय.
Vijay Vadettiwar
Vijay Vadettiwar saam Tv

Vijay Vadettiwar Slams On BJP Govenrment In Gadchiroli :

देशांतील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लोकशाही पुरस्कृत संविधान लिहून देशाला उत्तम घटना दिली. मात्र सध्याच्या केंद्रातील मनुस्मृति विचारांचे सरकारने देशातील नागरिकांची लूट करुन, धर्मांधतेच्या नावावर दिशाभूल करीत व्यापारी हित जोपासून देशाच्या नागरिकांचे रक्षण कवच असलेल्या पवित्र संविधान पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न चालवलाय. (Latest News)

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून जगावे लागेल, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ चामोर्शी येथे आयोजीत सभेत बोलत होते.

आजच्या प्रचार सभेस प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा, रायुकॉ प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ॲड. राम मेश्राम, गडचिरोली रा. कॉ. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवर, चंद्रपूर रा कॉ. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेस महीला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. कविता मोहरकर, संजय ठाकरे, लोमेश बुरांडे, राजू आत्राम, विजय गोरडवार, कबिरदास आभारे, अशोक तिवारी, सुरेश नैताम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

देशातील शेतकरी, कामगार, युवक नोकरदार वर्ग आणि सर्व नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेत. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण यामुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असून आता विरोधकांना संपविण्याचा डाव आखला जात आहे. खते, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅस यात प्रचंड दरवाढ आणि जीएसटीच्या माध्यमातून जनतेची लूट केली जातेय. अशा निष्ठूर सरकारविरुद्ध आता पेटून उठून देशातील संविधान टिकविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सभेत बोलताना म्हणाले.

देश सुरक्षित नाही,देशांतील महीला सुरक्षित नाही,माहिला खेळाडूंचे शोषण करणारे मोकाट फिरत आहे,अशी अवस्था देशाची झाली आहे. तर विद्यमान खासदार अशोक नेते हे संसदेत मौन धारण करून बसतात अशा मौनी बाबाला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देतात ही हास्यास्पद बाब असल्याची टीका विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली. तर देशातील भाजप सरकार हे आदिवासी, शेतकरी, कामगार, युवक विरोधी सरकार असून देशाच्या शेतकऱ्यांना आजवर हमीभाव दिला नाही.

पेपर फुटीमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. मात्र सरकार कारवाईकडे पाठ फिरवीत आहे. देशांत तानाशाही सुरु असून पक्ष आणि कुटुंब फोडले जात असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली. त्यामुळेच सत्ताबदल करण्यासाठी ताकदीने एकत्र लढले पाहिजे असा निर्धार आज या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने केला.

Vijay Vadettiwar
Nanded Government Hospital: राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे : विजय वडेट्टीवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com