PARBHANI-JINTUR HIGHWAY ACCIDENT: THREE FAMILY MEMBERS KILLED IN ST BUS AND BIKE COLLISION Saam tv
महाराष्ट्र

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! भरधाव एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Parbhani Bus Accident News : परभणी-जिंतूर महामार्गावर एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Alisha Khedekar

  • परभणी-जिंतूर महामार्गावर एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक

  • अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

  • पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला

  • मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले

विशाल शिंदे, परभणी

Parbhani Jintur ST Bus Accident 3 Dead परभणी-जिंतूर महामार्गावर भीषण अपघात घडला. जिंतूर तालुक्यातील कोक-पिंपरी फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भगवान काळे,सुशिलाबाई काळे आणि शिवम काळे अशी मृतांची नावे असून शिवम हा भगवान आणि सुशिलाबाई यांचा नातू होता.या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवळी येथील भगवान काळे, त्यांची पत्नी सुशिलाबाई काळे आणि त्यांचा १२ वर्षीय नातू शिवम काळे हे दुचाकीवरून आपल्या गावी परतत होते. दरम्यान, परभणी-जिंतूर महामार्गावरील कोक-पिंपरी फाट्याजवळ त्यांची दुचाकी आणि समोरून येणारी एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात भगवान काळे, सुशिलाबाई काळे आणि शिवम काळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही वेळ परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, मृत तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघाताची बातमी समजताच काळे कुटुंबीयांसह शेवळी गावावर शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघातानंतर एसटी बस चालक थेट बोरी पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. दरम्यान, कोक–पिंपरी फाटा हा परभणी-जिंतूर महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी गतिरोधक व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव असल्याने वारंवार अपघात होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. येथे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT