Parbhani Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

Kalyan - Nirmal Highway : परभणी जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन शिक्षकांना जोरदार धडक दिली.

राजेश काटकर

Parbhani News: परभणी जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन शिक्षकांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळाताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  (Latest Marathi News)

रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ अशी मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांची नावे आहेत. दोन्ही शिक्षक मानवत (Parbhani) येथील शकुंतला विद्यालयातील असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कदम आणि राऊळ हे दोघेही शिक्षक दुचाकीवरून आज पहाटेच्या सुमारास महाविद्यालयात निघाले होते.

मानवत शहरातून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार (Accident) धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दोन्ही शिक्षकांची घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही शिक्षकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेनंतर ट्रकचालक हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pyaar Mein Hain Hum : टी-सीरिजकडून खास गिफ्ट! रोमँटिक पावसाळी गाणं "प्यार में है हम" ने चाहत्यांची मने जिंकली

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

SCROLL FOR NEXT