Parbhani Saam
महाराष्ट्र

Parbhani: दुचाकीला टिप्परची जबर धडक, उपसरपंचाचा जागीच मृत्यू, बहिणीसह मुलगा गंभीर जखमी

Speeding Tipper Hits Bike Deputy Sarpanch Dies On The Spot: दैठणा-माळसोन्ना रस्त्यावर भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात पोरवड गावाचे उपसरपंच प्रल्हाद गिराम यांचा जागीच मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

दैठणा-माळसोन्ना रस्त्यावर भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात पोरवड गावाचे उपसरपंच प्रल्हाद गिराम यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची बहीण आणि लहान मुलगाही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताच्या कारणाचा सखोल तपास सुरू आहे. या धक्कादायक अपघातानंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

प्रल्हाद गिराम असे मृत उपसरपंचाचे नाव आहे. ते आपल्या दुचाकीवरून दैठणा माळसोन्ना रस्त्यावरून जात होते. उपसरपंच यांच्यासोबत दुचाकीवर त्यांची बहीण आणि लहान मुलगाही सोबत होता. रस्त्यावर अचानक भरधाव वेगाने टिप्पर आली. टिप्परने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी उलटली आणि दुचाकीवरील उपसरपंच, त्यांची बहीण आणि त्यांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली.

गंभीर अपघात घडल्यानंतर त्यांना तातडीने परभणी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच उपसरपंच प्रल्हाद गिराम यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपसरपंच यांची अपघाताच्या मृत्यूची नोंद केली. अपघाताच्या सखोल तपास पोलिसांकडून सुरू असून, फरार आरोपी टिप्पर चालकाचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, उपसरपंच यांच्या अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Land Measurement : आता जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत, अर्ज कोठे, कसा करायचा? वाचा...

कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तुडूंब पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली; २ मुली बुडाल्या

Nashik Tourism : हिवाळ्यात ट्रेकर्सची पसंती, नाशिकमधील 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Bigg Boss 19-Pranit More : मालतीसोबतच्या भांडणावर प्रणित मोरेची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT