Parabhani Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Parabhani News: तीन दिवसात ३ आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी २६ वर्षीय विवाहित तरुणाने संपवले आयुष्य; परभणी जिल्ह्यातील घटना!

राजेश काटकर

Parabhani Breaking News:

परभणी जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आज (१२, फेब्रुवारी) सलग तिसऱ्या दिवशी आरक्षणासाठी मराठा तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. पाथरी तालुक्यातील सरोळा बुद्रुक गावात ही दुर्दैवी घटना घडली असून आकाश बुलंगे असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी परभणीच्या पाथरी तालुक्यातील सरोळा बुद्रुकमध्ये २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश बुलंगे असे या तरुणाचे नाव आहे. या विवाहित तरुणाने आज पहाटे शेतात गळफास घेत आपले आयुष्य संपवले.

माझ्या मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्यासाठी सगे सोयरेचा कायदा पारित होणे आवश्यक आहे. परंतु शासन कायदा पारित करत नसल्याने तो चिंताग्रस्त असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, मराठा आरक्षणााठी परभणी जिल्ह्यातील (Parabhani News) ही तिसरी आत्महत्येची घटना आहे. तीन दिवसांपूर्वी सेलू तालुक्यातील राजवाडीमध्ये प्रताप दिनकरराव शेवाळे  त्यानंतर सोनपेठ तालुक्यातील नरवाडी उद्धव बाळासाहेब जोगदंड या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या आत्महत्यांच्या घटनांनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai News: रक्षकच ठरले भक्षक! विद्यार्थिनीचा पोलिसांकडून विनयभंग, ६ जणांना अटक; वसईतील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Updates: बोराळा जहांगीर ते खंडाळा शिंदे रस्त्याची अत्यंत दुरवस्था, रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी

Assembly Election : उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवा; निवडणूक आयोगाला सूचना

Nitanshi Goel: 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीची कमाई ऐकून उडतील होश!

World Heart Day: पुरुष-महिला यांच्यात हार्ट अटॅकची वेगळी लक्षणं दिसून येतात? पुरुषांमध्ये दिसतात ही लक्षणं

SCROLL FOR NEXT