Parabhani News: Saamtv
महाराष्ट्र

Parabhani News: मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस विलंब.. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने संपवले आयुष्य

Parabhani News: परभणीच्या सोनपेठ तालुक्यात आणखी एका युवकाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राजेश काटकर

Parabhani News:

दोन दिवसांपूर्वी परभणीच्या सेलु तालुक्यात मराठा आरक्षणासाठी २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच परभणीच्या सोनपेठ तालुक्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठा आरक्षणासाठी परभणीच्या (Parabhani) सोनपेठ तालुक्यात तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब जोगदंड असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अंतरवाली सराटी येथून तो संध्याकाळी आपल्या गावी नरवाडी येथे पोहोचला. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला होत असलेल्या विलंबाची चर्चा त्यांनी गावातील नागरिकांशी व मित्रांशी केली.

सरकार मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला विलंब लावत असल्याने तो दुःखी होता. यामुळेच व्यथित होऊन काल रात्री (१०, फेब्रुवारी) उशिरा झाडाला गळफास लावून घेत त्याने आयुष्य संपवले. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन दिवसातील दुसरी घटना...

दरम्यान, परभणी जिल्ह्यात तीन दिवसात मराठा आरक्षणासाठी दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काल सेलू तालुक्यातील राजवाडी येथील तरुण प्रताप शेवाळे नावाच्या तरुणानेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सगेसोयरेबाबतचा कायदा पारित होत नसल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्याने चिठ्ठीमध्ये लिहले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT