Nandurbar News: रस्ता फक्त कागदावरच; नंदुरबारमधील ग्रामसडक योजनेचं भीषण वास्तव; नागरिकांनी उचललं मोठं पाऊल

PM Gram Sadak Yojana Nandurbar: नंदुरबारमधील दुर्गम भागातील रस्ता दुरुस्तीसाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे. तिनसमाळ येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता फक्त कागदावरच दिसून येत आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam Tv
Published On

Nandurbar Tinasmal Road Temporarily Repaired

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नर्मदा काठावरील तिनसमाळ गावाचा रस्ता पूर्णतः खराब झालाय. रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झालीय. त्यामुळे गावातील युवकांनी एकत्र येऊन तो रस्ता दुरुस्त केला आहे. तिनसमाळ गावात नेहमीच मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. पाणी, रस्ता, आरोग्य, दवाखाना, दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. (Latest Marathi News)

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील (PM Gram Sadak Yojana) रस्त्याचं काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे असल्यामुळं दोन चार वर्षातच पूर्णतः खराब झाला आहे. ग्रामस्थांनी अनेकवेळा याबाबत निवेदनं दिली. मात्र, शासन प्रशासनानं दुर्लक्ष करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदावर रस्ता पूर्ण केला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्त्याचा प्रश्न गंभीर

ग्रामस्थांना नेमही बाजारपेठ, दवाखान्यासाठी धडगाव शहरात येजा करावे लागते. मात्र रस्त्यावरून केव्हा गाडी घसरून दरीत जाईल याची शाश्वती नाही. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन रस्ता (Nandurbar Tinasmal Road) तात्पुरता दुरुस्त केला आहे. मात्र, आता शासन प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आता ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं ठरविलं आहे.

प्रशासनाने दखल घेण्यासाठी तालुक्यातील आणि जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट द्यावी. एसीच्या खुर्शीत बसून विकास दिसतो. मात्र, वास्तविकता जाणण्याची अत्यंत गरज आहे, असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे.

Nandurbar News
Meera Road Death | पतंग पकडणं बेतलं जीवावर! इमारतीवरुन पडून 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू...

संतप्त ग्रामस्थांची मागणी

तिनसमाळ ग्रामस्थांना किमान भारताचे नागरिक म्हणून मूलभूत सुविधा पुरवाव्या. नाहीतर, देशाबाहेरील गाव म्हणून घोषित करून स्वतंत्र देश म्हणून जाहीर करावं, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली (Nandurbar News) आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुलभूत सुविधा देखील नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होतेय. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. रस्त्याची स्थिती अनेक गावांमध्ये दयनीय (PM Gram Sadak Yojana Nandurbar) आहेत. यामुळे नागरिकांमध्ये आता संताप दिसून येत आहे.

Nandurbar News
Crocodile Under Road: बापरे बाप! रस्ता फोडून बाहेर निघाल्या भल्या मोठ्या मगरी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com