accident  Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Solapur Highway : अक्कलकोटला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू

Pune–Solapur Highway Accident Death Toll : पुणे–सोलापूर महामार्गावर मोहोळ येथे भीषण अपघात झाला असून पनवेलहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा झाडावर आदळून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Namdeo Kumbhar

Pune Solapur Highway accident near Mohol today : पनवेलवरून अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातलाय. पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एका कारचा शनिवारी रात्री भयंकर अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये ३ पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे. सर्वजण पनवेलहून एरटिका कारने  (MH-46 Z 4536) अक्कलकोलटला देवदर्शनला जात होते, त्यावेळी मोहोळमधील देवडी पाटी येथे भंयकर अपघात झाला. (Panvel to Akkalkot devotees car crash news)

पुणे–सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एरटिका कार आल्यानंतर चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जोरदार आदळली. या भयंकर अपघातात ३ पुरूष आणि २ महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मोहोळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी महिलेला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघातग्रस्त वाहनातील सर्व भाविक हे एकमेकांचे मित्र होते. पनवेलमधील सेक्टर 7 मध्ये राहणाऱ्या ज्योती जयदास टाकले या अपघातामधून थोडक्यात बचावल्या आहेत. त्या गंभीर जखमी असून मोहोळमधील ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवदर्शनाला जाताना भयंकर अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अपघात इतका भयंकर होता की कारचा चुराडा झाला. मृतदेह कारमध्ये चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले. कार हायवेपासून १० ते १५ फूट अंतरावर झुडुपांमध्ये अडकली होती. अपघातामधील मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. मोहोळ पोलिसी स्टेशनमधील पोलीस निरीक्षक शेडगे या अपघाताचा तपास करत आहेत. या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी भरत भगतला अटक

Raj K Purohit Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन

Republic Day 26 : 'उरी' ते 'राझी'; प्रजासत्ताक दिनाला लहान मुलांना आवर्जून दाखवा 'हे' देशभक्तीपर चित्रपट

8th Pay Commission: लेव्हल १ ते १८; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

BMC Mayor Election: शिंदेंचं इकडे हॉटेल पॉलिटिक्स, तिकडे ठाकरेंचा डाव, BMC महापौरपदासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT