Panvel News Saam tv
महाराष्ट्र

Panvel News: प्रेम प्रकरणातून उचलले टोकाचे पाऊल; दोन दिवसांपासून होते बेपत्‍ता

प्रेम प्रकरणातून उचलले टोकाचे पाऊल; दोन दिवसांपासून होते बेपत्‍ता

साम टिव्ही ब्युरो

पनवेल : पनवेलमधील टॉवरवाडी या आदिवासी पाड्यामधील अल्पवयीन मुलगी आणि वीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांनी प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्‍याचे सांगितले जात आहे. (Maharashtra News)

पनवेलमधील टॉवरवाडी परिसरातील आदिवासी पाड्यामधील सदर मुलगी व युवक आहे. मुलगी 16 वर्षाची आणि युवक 20 वर्षाचा असून, ते दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्‍यान आज गावा शेजारील जंगलात ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत. त्‍यांना ग्रामीण रुग्णालयात (Hospital) नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

विरोध असल्‍याने टोकाचे पाऊल

दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मात्र त्‍यांच्‍या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. या विरोधातूनच दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...

2026 मध्ये WhatsApp चॅटिंगचा अंदाज बदलणार; जे लिहू त्याचा Sticker बनेल, आताच जाणून घ्या 3 स्मार्ट फीचर्स

मुदत संपली,आता HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? खर्च किती होणार? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: 'ज्याने मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक, महापाप केलं तो महापौर', देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT