Panvel News  Saam tv
महाराष्ट्र

Panvel News : धक्कादायक! आठव्या मजल्यावरून पडून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू

पनवेलमधील एक इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Panvel News : पनवेलमधून धक्कादाययक घटना समोर आली आहे. पनवेलमधील एक इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोज मेरी निरिश असे मृत तरुणीचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील (Panvel) इंडिया बुल्स येथील अष्टर सोसायटी मधील इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडून एका २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोज मेरी निरिश असे मृत २० वर्षीय तरुणीचे नाव आहे.

कोनगाव समोरील इंडिया बुल्स मधील अस्टर इमारतीत 8 व्या मजल्यावर एक तरुणासोबत राहत होती. मेरी ही अमित युनिव्हर्सिटी फॅशन डिझायनिंग च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती, तर तिचा मित्र फोटोग्राफीचा कोर्स करत आहे.

नेमकं काय घडलं?

पनवेलमधील इंडिया बुल्स येथील अष्टर सोसायटी मधील इमारतीत रोज मेरी निरिश मित्रासोबत राहत होती. मेरी ही अमित युनिव्हर्सिटी फॅशन डिझायनिंग च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती तर तिचा मित्र फोटोग्राफीचा कोर्स करत आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता मेरी इमारतीच्या बाल्कनीमधून खाली पडली. त्याचवेळी बाजूला असलेल्या सुरक्षा रक्षक आणि इमारतीतील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी तिला तात्काळ पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले .मात्र, डोक्याला जबर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी मेरीला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस (Police) अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Protest: ऐन दिवाळीत शेतकरी रस्त्यावर, पुणे-बंगळूरू महामार्गावर रास्तारोको; उसाला 4500 रुपयांचा दर देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना 5 लाखांचा दंड, BMC आयुक्तांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Bank Election: जिल्हा बँकांची तिजोरी कुणाकडे? साताऱ्यात शिंदेसेना भाजपचा बदला घेणार?

Vastu Tips for Shoes and Footwear: घराच्या दारासमोर चप्पल-बूट ठेवावे की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम!

सत्तेतला पक्ष, पण कामांचा पत्ता नाही? वरिष्ठ नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला? देवगिरीवरील बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT