Pankaja Munde’s Ramp Walk Sparks Political Controversy Amid Drought Criticism saam tv
महाराष्ट्र

दुष्काळात पंकजा मुंडेंचा रॅम्प वॉक! विरोधकांच्या टीकेला दिलं सडेतोड उत्तर

Pankaja Munde Participate in a Ramp Walk : आता बातमी आहे पंकजा मुंडेंच्या रॅम्प वॉकची, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना रॅम्प वॉकमुळे विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलंय. तर विरोधकांच्या टीकेला मुंडेंनी प्रत्युत्तर देत भूमिका स्पष्ट केली. मात्र, दुष्काळातच पंकजा मुंडेंनी रॅम्प वॉक का केला? नेमकं कारण काय आहे? पाहूयात या रिपोर्टमधून.

Rohit Kadam

  • पंकजा मुंडेंच्या रॅम्प वॉकमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा

  • विरोधकांच्या टीकेला पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर देत आपली भूमिका

  • पंकजा मुंडेंनी रॅम्प वॉकमध्ये सहभागी होण्यामागचं नेमकं कारण काय

राज्यातील नेतेमंडळी राजकारण सोडून वेगळ्याच अंदाजात दिसली तर चर्चा होणारच. अशीच चर्चा रंगली ती राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची. त्याचं झालं असं की, मुंबईतील एका फॅशन शोमध्ये 'वॉक फॉर अ कॉज' या कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या. आणि सहभागी होत त्यांनी एखाद्या मॉडेलला साजेसा रॅम्प वॉकही केला.आता याच रॅम्प वॉकमुळे विरोधकांनी पंकजा मुंडेवर टीकेची झोड उठवलीय.

तर दुसरीकडे, जालन्यातील महिला शेतकऱ्याच्या कामाला ओळख मिळवून देण्यासाठीच आपण रॅम्प वॉक केल्याचं प्रत्युत्तर पंकजा मुंडेंनीही उत्तर दिलंय. पंकजा मुंडेंनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली असली तरी राज्यात दुष्काळाचं संकट गडद झालेलं असताना जबाबदार मंत्र्यांकडूनच अशा पद्धतीनं एखाद्या ब्रँडसाठी पुढाकार घेणं कितपत योग्य आहे अशी चर्चा आता रंगलीय. त्यामुळे ब्रँडच्या प्रमोशनसाठी मुंडेंनी अन्य पर्यांयाचा विचार करायला हवा होता की लोकल ब्रॅंडला प्रमोट करण्यासाठीचा त्यांचा रॅम्प वॉक योग्य होता? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 4: 316 आसन क्षमता, 6 डबे; अशी असेल मुंबई ते ठाणेदरम्यान धावणारी मेट्रो, आंध्रप्रदेशच्या कारखान्यातून मेट्रो 4 चा ग्राऊंड रिपोर्ट

राष्ट्रवादीत पार्थवरून महाभारत? पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर आमदार नाराज? NCPच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Political News: मोठी बातमी! दिवाळीनंतर मोठा राजकीय भूकंप, भाजप 'या' मोठ्या पक्षासोबत युती करणार

Fact Check: दिवाळीत 10, 20, 50च्या नोटांचा तुटवडा होणार,RBIकडून लहान नोटांची छपाई कमी? काय आहे सत्य?

Maharashtra News Live Update : ऊस दरासाठी नागठाणे येथे 'स्वाभिमानी'चा रास्ता रोको; पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT