Pankaja Munde Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा अमित शहांशी वन टू वन संवाद; बीडची उमेदवारी पक्की? चर्चेला उधाण

Political News : काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेमध्ये आणि दोघांच्या संवादामध्ये राजकीय पटलावरचे नवे संकेत मिळाल्याची चर्चा आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Pankaja Munde News :

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकीय प्रक्रियेतून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलले जात असल्याची चर्चा होती. शिवाय स्वतः पंकजा मुंडे यांनी याबाबत वेगवेगळ्या व्यासपीठावर आपली मनातली खदखदही व्यक्त केली होती. मात्र आता पंकजा मुंडे यांना राज्यातच नाही तर देशातील भाजपाच्या राजकीय प्रक्रियेत चांगले दिवस येतील अशी चर्चा सुरू झालीय.

काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेमध्ये आणि दोघांच्या संवादामध्ये राजकीय पटलावरचे नवे संकेत मिळाल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर भाजपचे माजी ज्येष्ठ नेते आणि आताच्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचंही पॅचअप होईल अशी शक्यता वर्तविली जातेय. काल झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनीही त्याच आत्मविश्वासाने त्यांचं भाषण होते.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्तरावरच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपचे प्रभावशील नेते आणि भाजपपासून दूर गेलेले मात्र भाजपाचा विचार असणाऱ्या नेत्यांना आता सोबत घेण्यासाठी जुळवणी सुरू आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्याकडून मराठवाड्यातील स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी निवडून येण्याची क्षमता याच एकमेव निकषावर उमेदवार निश्चित करण्याचे निर्देश दिले.

याद्वारे शहा यांनी एकप्रकारे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वालाच कौल दिला. यामुळे पंकजा मुंडे यांची बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. यामुळे पंकजांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे काल अमित शहा हे जळगाव दौऱ्यावर होते. शहा यांच्या दौऱ्यापूर्वीच सरकारने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाईलाही ब्रेक लावला आहे. यामुळेही भाजपने त्यांच्याशीही पॅचअप करण्याचे धोरण आखल्याचे स्पष्ट होत आहे.

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचा ओबीसीमध्ये मोठा विश्वास आहे. शिवाय मूळ भाजपच्या विचाराशी असल्याने दोघांचीही नाराजी दूर करत जवळ करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT