Pankaja Munde Saam TV
महाराष्ट्र

माझा फार्म हाऊस नाही, माझा महाल नाही; पंकजा मुंडेंची थेट धनंजय मुंडेंवर टीका

परळीत चुकून झालेला विजय धनंजय मुंडे यांना महागात पडणार- पंकजा मुंडे

विनोद जिरे

बीड: परळी चुकून झालेला विजय धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना महागात पडणार आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव न घेता धनंजय मुंडेवर टीका केली आहे. तसेच परळीमध्ये (Parli) माझा फार्म हाऊस नाही, माझा महाल नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडले आहे. बीड जिल्ह्यातील धारूर (Dharur) येथील शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होते. यावेळी त्यांनी चौफेर टीका केली आहे.

हे देखील पहा-

राज्याच्या राजकारणामध्ये (politics) आज चालू असलेली सर्कस सुरू आहे. त्या सर्कशीत आपण नाहीत, ती बाहेरून पाहायला बरी वाटतेय, असे म्हणत आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे, ज्या दिवशी माझ्याकडून जिल्ह्याची बदनाम होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास असणार आहे. स्वर्गातही गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची मान खाली जाणार नाही, अशा पद्धतीने वागत आहे. पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या बदनामी वर धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले आहे.

भविष्यात शिवसेना भाजप कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. या संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणाल्या, की आता यावर काही बोलू शकत नाही, त्यांची भावना आहे.. त्या भावनेला पक्षातील प्रदेशाध्यक्ष उत्तर देतील. अस म्हणत राजकारणात कधीही कुठली भविष्यवाणी बदलू शकते, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी संजय राऊत यांच्या विधानावर सूचक उत्तर दिले.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT