Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde: पंकजा मुंडे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; बीडमध्ये झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pankaja Munde Birthday: पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये झळकलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या बॅनरमुळे जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Priya More
  • पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्सबाजी

  • जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकले

  • बीडमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • पंकजा मुंडे समर्थकांची पोस्टरबाजी

योगेश काशिद, बीड

'पंकडा मुंडे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर बीडमध्ये झळकल्याचे पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा वर्षाव करत समर्थकांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत. यातच जतेच्या मनातील मुख्यमंत्री या आशयातील बॅनर्सने सर्वांचे लक्ष वेधले असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत आता उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. मात्र बीड शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर 'पंकजा मुंडे... जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असा ठळक उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत.

बीड येथील शासकीय विश्रामगृहासमोर लावण्यात आलेल्या या आकर्षक बॅनरवर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो, मंत्री पंकजा मुंडे यांचे मोठे छायाचित्र तसेच शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे फोटो झळकत आहेत. विकास ढोरमारे आणि साहस आदोडे यांनी हा शुभेच्छा फलक उभारला आहे. या बॅनरमुळे बीडमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच "जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" असा उल्लेख केल्याने या बॅनरची राजकीय अर्थाने चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बॅनरकडे राजकीय निरीक्षक आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले असून, बीडच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

Chanakya Niti: लग्नानंतर रोज भांडणं होतायेत? ही ५ कारणं नक्की जाणून घ्या! काहीच दिवसांत जाणवेल बदल

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टात याचिका; वगळलेली मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT