Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde News: बीडच्या परळीतून कोण निवडणूक लढवणार? पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या...

Pankaja Munde News: पंकजा मुंडे यांची आज अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड आणि खर्डा येथे आल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी बीडच्या परळी विधानसभा उमेदवारीवर भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात

Pankaja Munde Latest News:

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेअंतर्गत नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या यात्रेसाठी पंकजा मुंडे यांची आज अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड आणि खर्डा येथे आल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी बीडच्या परळी विधानसभा उमेदवारीवर भाष्य केलं. (Latest Marathi News)

पंकजा मुंडे यांनी अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. परळी विधानसभा तिकीटावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'पाथर्डी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या, मला राज्यातून पंचवीस ठिकाणी आमदारकीला उभे राहण्याच्या मागण्या आल्या आहेत'.

राज्याच्या राजकारणात भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी निवडणुकीला तिकीट वाटपामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आता परळीमध्ये पंकजा मुंडे की धनंजय मुंडे या प्रश्नावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ज्यांनी ही युती केली आहे ते ठरवतील आणि ते मला सांगतील. मला तो निर्णय पटला तर मी काय करायचे ते ठरवेल'.

शिवशक्ती परिक्रमा यात्रेविषयी भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'या यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मला या यात्रेत स्वतःच बॉडीगार्डचं काम आणि वाढप्याचे काम करावे लागत आहे. एवढी गर्दी जमा होतेय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे'.

पंकजा मुंडे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्याच्या सीमेवर पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आलं. शिवशक्ती परिक्रमा यात्रेचं आज बीड जिल्ह्यात आगमन झालं. यावेली कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात तोफांची अतेशाबजी आणि महिलांनी औक्षण केलं.

यावेळी पाटोदा ,बीड, वडवणी ,तेलगाव सिरसाळा,परळी या ठिकाणी जंगी स्वागत केले जाणार आहे.दोन महिन्यांच्या ब्रेक नंतर पंकजा मुंडे जिल्ह्यात परत येत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Photos: नोरा आली अन् वातावरण बदललं, फोटोशूट पाहून चाहते घायाळ

दिवाळीनंतर सर्वसामान्यांची 'चांदी'; दरात ३५ हजारांची घसरण, सोन्याच्या भावातही घट होणार?

ICC Women's World Cup 2025: वर्ल्डकप सेमीफायनलचा थरार रंगणार, भारत-ऑस्ट्रेलिया पुन्हा भिडणार, कधी होणार सामना?

Kalyan Dombivli Crime : दादा, भाईंची आता खैर नाही! नाशिकनंतर कल्याण डोंबिवलीत पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Shocking : बजरंग दलाच्या अध्यक्षाकडून 17 वर्षीय तरुणाची हत्या; छत्रपती संभाजीनगरात खळबळ, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT