Pankaja Munde News Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde : निकाल जो लागेल तो लागेल...; लोकसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडेंनी व्हिडिओ शेअर करत घातली भावनिक साद

Pankaja Gopinath Munde : निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीनंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीयावर एक व्हीडीओ शेअर केलाय. यामध्ये त्या म्हणतात, "निकाल जो लागेल तो लागेल. लोकांनी सकारात्मकतेने साथ दिली.

Ruchika Jadhav

राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी पाच टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. काही ठिकाणी तर निकाल लागण्याआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकलेत. ४ जूनला लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असताना आता बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत मतदारांना आणि कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीनंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीयावर एक व्हीडीओ शेअर केलाय. यामध्ये त्या म्हणतात, "निकाल जो लागेल तो लागेल. लोकांनी सकारात्मकतेने साथ दिली, निर्भीडता ही निष्क्रीयतेवर भारी ठरते. देवाने मला मोठा संघर्ष दिला आणि त्याला पेलण्याची शक्तीही देवाने दिली."

"लढाई विचारांची असावी, कोणाचाही कायमस्वरुपी तिरस्कार वाटू नये अशा विचारात जडण घडण झाली पाहिजे. सत्तेच्या पदावर काम करताना या गोष्टीचे पथ्य पाळले पाहिजे. मंत्री म्हणून काम करताना कोणावर अन्याय केला नाही, याचं समाधान वाटतं", असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं.

"द्वेषविरहीत राजकारण करणं सोपं नाही, मुद्यांना धरुन राजकारण करायला हवं. एक मिशन असावं, उद्देश असावं, असं राजकारण करावं हे शिवधनुष्य पेलण्याचं काम मी करते, हे केवळ तुमच्या प्रेमापोटी. तुमचे आशिर्वाद नेहमीच सोबत ठेवा", अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : जुन्नरच्या डोंगररांगांतील अभेद्य किल्ला, 'हे' ठिकाण जपतंय ऐतिहासिक ठेवा

Surat Bus Accident: सुरतमध्ये भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या; धडकेनंतर बसने घेतला पेट, ८ जणांचा जागीच मृत्यू

Best Exercises: डॉक्टरांनी सुचवले डायबेटीस, BP आणि हार्ट पेशंटसाठी 5 सर्वोत्तम व्यायाम

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; मुरूम-तुगाव परिसर झोडपला

भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT