Pankaja Munde: मी बाई माणूस असून घाबरत नाही, कॉमेंट काही नागाचा दंश आहे का ? पंकजा मुंडे

Beed Lok Sabha Election : बीड लाेकसभा मतदारसंघातील नेकनूर येथे आयाेजिलेल्या जाहीर सभेत महायुतीच्या उमेदवार पकंजा मुंडे बोलत होत्या. या सभेस महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
pakaja munde appericiate manoj jarange patil on maratha reservation
pakaja munde appericiate manoj jarange patil on maratha reservationSaam Digital

मराठा आरक्षणासाठी मनाेज जरांगे पाटील यांचे त्याग, बलिदान, कष्ट आहेत. त्या विषयी आदर आहे. ते आरक्षणाचे हिरो आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला, आंदोलनाला जा पोस्ट करा. मी बाई माणूस असून घाबरत नाही. कॉमेंट काही नागाचा दंश आहे का ? असा सवाल महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांचे काैतुक करीत समर्थकांनी साेशल मिडीयापासून काही दिवस दूर राहा असा सल्लाही दिला. (Maharashtra News)

बीड लाेकसभा मतदारसंघातील नेकनूर येथे आयाेजिलेल्या जाहीर सभेत महायुतीच्या उमेदवार पकंजा मुंडे बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या पुढचे उमेदवार यांच्या विरोधात बोलले तर तुम्हांला का मिरची लागते ? ते उमेदवार एका राजकीय पक्षाचे आहेत. त्यांचे सरकार होते. त्यांनी आरक्षण दिले नाही, पहिल्यांदा भाजपने मराठा आरक्षण दिले असेही मुंडेंनी नमूद केले.

pakaja munde appericiate manoj jarange patil on maratha reservation
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, मतदान करा... अन्यथा तुमचेही नाव यादीत येईल, वाचा जिल्हाधिका-यांचा आदेश

मी बाई माणूस असून घाबरत नाही, किती धिंगाणा घातला तरी घुसून भाषण करते, तुम्ही पुरुष असुन का घाबरता. पोस्ट आणि कमेंटला. कॉमेंट काही नागाचा दंश आहे का ? 14 पर्यंत सोशल मीडिया बंद ठेवा असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केले.

Edited By : Siddharth Latkar

pakaja munde appericiate manoj jarange patil on maratha reservation
Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीया निमित्त धुळे, संभाजीनगरसह नंदुबारमध्ये फळांचा राजा आंबा खातोय भाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com