Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Vitthal Mandir Video : विठुरायाच्या गाभाऱ्यात १३० किलो चांदीची मेघडंबरी

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी एकादशी जवळ आल्याने विठुरायाचे मंदिर सजावटीचे काम सुरूच आहे. भाविकांची गर्दी होत असताना देखील मंदिर समितीकडून काम सुरूच आहे. यात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यात १३० किलो वजनाची चांदीची मेघडंबरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. 

विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Mandir) जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. मंदिराला पूर्वीचे रूप देण्याचे काम पूर्ण झाले असल्याने आषाढी यात्रेनिमित्ताने पंढरीत (Pandharpur) येणारे वारकरी व भाविकांना मंदिराचे नवीन रूप पाहण्यास मिळत आहे. दरम्यान विठुरायाच्या गाभाऱ्यातील पूर्वीची जीर्ण झालेली मेघडंबरी देखील काढून टाकून त्या ठिकाणी नवीन सागवानी मेघडंबरी बसविण्यात आली आहे. लातूर येथील सुमीत मोर्गे या विठ्ठल भक्ताने मेघडंबरीसाठी सुमारे‌ दोन कोटी ४५ लाख रूपयांची चांदी दिली आहे. यातून चांदीची मेघडंबरी बनविण्यात आली आहे. 

लातूरच्या (Latur) भाविकाने दिलेल्या रक्कमेतून विठ्ठलाच्या मेघडंबरीसाठी १३० किलो व‌ रूक्मिणीच्या मेघडंबरीसाठी ९० किलो चांदी वापरण्यात आली आहे. विठ्ठल आणि रूक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात चांदी जडीत मेघडंबरी बसविण्यात आली आहे. यामुळे विठ्ठल व रुक्मिणीचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देखील आता नव्या रूपात देवाचे दर्शन मिळणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'ची ऑफर स्वीकारणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं एका वाक्यात उत्तर

Marathi News Live Updates : चेंबूरमध्ये आग लागून एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

Shocking Video: धावती ट्रेन पकडणं अंगलट, तरुण मरता-मरता वाचला; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Mumbai News : मुंबईत मोठी दुर्घटना, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत भीषण आग; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

Latur Food Poisoning : खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ

SCROLL FOR NEXT