Buldhana News : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण निलंबित; बीबी येथील भाविकांना विषबाधा प्रकरण भोवले

Buldhana News : सप्ताहाच्या सातव्या दिवशी एकादशी असल्याने समारोपाच्या दिवशी भाविकांसाठी भगर, आमटीचा प्रसाद तयार करण्यात आला होता.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : फेब्रुवारी महिन्यात बीबी येथे भाविकांना भगरीच्या प्रसादातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या हेळसांडीचा फटका सीएस डॉ. सुभाष चव्हाण यांना बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष मारुतीराव चव्हाण यांना राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या जागी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार डॉ. भागवत भुसारी यांना सोपविण्यात आला आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आदेश प्राप्त झाले आहेत.  

Buldhana News
Ajanta Caves News : सावधान! अजिंठा लेणीतील धबधब्यावर रील्स काढाल तर थेट जेलमध्ये जाल; पोलिसांचा कडक इशारा

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील भगवान नाडे यांच्या शेतातील मंदिरामध्ये १४ फेब्रुवारीपासून सप्ताह सुरू होता. सप्ताहाच्या सातव्या दिवशी एकादशी असल्याने समारोपाच्या दिवशी भाविकांसाठी भगर, आमटीचा प्रसाद तयार करण्यात आला होता. मात्र हा प्रसाद खाल्ल्यामुळे सोमठाणा आणि खापरखेड येथील काही महिला व पुरुषांना त्रास होऊ लागला होता. साधारण ४०० हुन अधिक भाविकांना यातून विषबाधा झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने खासगी प्रॅक्टीस करण्यात आलेल्या (Doctor) डॉक्टरांना बोलावण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या पहता रुग्णालयाच्या आवारातच ताडपत्री टाकून झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन देत उपचार सुरू करण्यात आले होते. 

Buldhana News
Palghar News : खैर जातीची झाडे तोडून परस्पर विक्री; चार जणांवर गुन्हा दाखल, वन कायद्यांतर्गत कारवाई

दरम्यान सदर वृत्त संपूर्ण देशभरामध्ये गाजले होते. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सदर घटनेची गंभीर दखल घेतली होती. बुलढाणा जिल्ह्यातील रूग्णांच्या दयनीय परिस्थितीबद्दल ॲमिकस क्युरी (निष्पक्ष सल्लागार) वकील मोहित खन्ना यांनी अनेक बातम्या सादर केल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. यांच्या खंडपीठाने सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश त्यावेळी दिले होते. याच प्रकरणाचा फटका डॉ. चव्हाण यांना बसला आहे. सदर घटनेमुळे आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य आरोग्य विभागाने डॉ. चव्हाण यांना निलंबित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com