तब्बल 26 वर्ष राष्ट्रवादीची साथ दिल्यानंतर कॉग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करताना प्रशांत जगताप यांनी केलेलं हे वक्तव्य.. राष्ट्रवादीच्या राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप यांनी ठाकरेसेना आणि शिंदेसेनेची ऑफर नाकारत काँग्रेसचा हात धरलाय.
कोण आहेत प्रशांत जगताप?
1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय प्रवास
पुणे महानगरपालिकेत सलग 2 वेळा नगरसेवक
2016मध्ये पुणे महानगरपालिकेचे महापौर
2021मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती
राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय
2024मध्ये हडपसर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली त्यात जगतापांचा पराभव
प्रशांत जगतापांच्या रुपानं काँग्रेसला पुण्यात ऐन महापालिकेच्या तोंडावर नवा चेहरा मिळालाय.. त्यामुळे जगतापांच्या पक्षप्रवेशानं काँग्रेसला पुण्यात काय फायदा होणार?
पुण्यात काँग्रेसला फायदा कसा?
हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार
राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची मोठी फळी जगतापांबरोबर काँग्रेसमध्ये दाखल होण्याची शक्यता
जगतापांच्या आक्रमक शैलीमुळे भाजपविरोधी संघटनात्मक ताकद वाढेल
राष्ट्रवादीच्या युती झाल्यास भाजपविरोधी मत काँग्रेसकडे वळण्यास मदत
पुणे महापालिकेत 2017 ला काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले होते... तर भाजपचे तब्बल 97. गेल्या नऊ वर्षात बरीच राजकीय उलथापालथ झाली. ज्या राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यामुळे जगतापांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्याच राष्ट्रवादीसह भाजपचंही आव्हानही जगतापांसमोर असेल. एवढंच नाही तर कॉग्रेसमध्ये आपली ताकद दाखवून द्यायची असेल तर अंतर्गत कुरघोडीवर ही यशस्वीपणे मात करणं जगतापांपुढे मोठं आव्हानं असणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.