Saturday Horoscope: भावनेच्या भरात नुकसान होईल, ४ राशींना मिळेल कर्माचे फळ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

चरतत्वाची असणारी आपली रास. प्रवासही खूप आवडतात. काहीतरी लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्रवासाचे योग आहेत. दुसऱ्याच्या तब्येतीसाठी हॉस्पिटल मध्ये खर्च होईल.

Mesh | saam tv

वृषभ

मनातील इच्छा पूर्णत्वाला जाण्याचा आजचा दिवस आहे. "जो जे वांछील तोते लाहो" अशा घटना घडतील. दिवस आनंदी आणि आपल्या लोकांबरोबर सकारात्मकतेने जाणार आहे.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

व्यवसाय करायचा आहे तर काहीतरी आव्हाने झेलावी लागतात. आज काही मोठ्या गोष्टी आणि घडामोडी व्यवसायात घडतील.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

भावनेला अधिक महत्त्व देणारी आपली रास आहे. पण अर्थात आजपर्यंत आपण वळून बघितले तर यामुळे काही आपले वाईट झाले नाही. देवाने दिलेल्या गोष्टींचे खूप छान पडसाद तुम्हाला दिलेले आहेत.

कर्क | Saam TV

सिंह

अहंकार आणि स्वाभिमान यामध्ये एक हलकी रेघ आहे. काही गोष्टी चुकीच्या व्यक्तीकडून करण्यासाठी आज वेळ दवडू नका.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

अधिक चौकस आणि बौद्धिकता चांगली असणारी आपली रास आहे. व्यवसायामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टींचे निर्णय घ्याल ते योग्य ठरणार आहेत.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

आपल्या चांगल्या क्षणावर अनेकांचा डोळा आहेच. काही गुप्त शत्रू या बाबतीत त्रास देतील असे वाटते आहे. आपले कोण, परके कोण ओळखून पुढे जा.

Tul Rashi | Saam Tv

वृश्चिक

अबोल्यात प्रेम असते असे काहीसे आपल्याला वाटते. पण काही दिवस हे व्यक्त करण्यासाठी असतात. आज आपल्या प्रियकराला बोलून आनंदी ठेवा.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

एखादी गोष्ट करताना संधी तर आपल्याला नेहमीच निर्माण होते. दुसऱ्या व्यक्तीने हिरवा कंदील दाखवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. दिवस चांगला आहे .

Dhanu Rashi | Yandex

मकर

स्वतःवरच्या अस्तित्वावर आपल्या कामगिरीवर अजिबात शंका घेऊ नका. "लेट पण थेट" अशी असणारी आपली रास. भावंडांकडून योग्य ते सहकार्य मिळेल.

मकर | Saam Tv

कुंभ

संपत्ती आयुष्यात महत्त्वाचीच असते हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. आज काही नव्याने गोष्टी आयुष्यात घडतील. चर्चा विचारविनिमय करून वारसा हक्काचे संपत्ती बाबत निर्णय घ्याल.

कुंभ | Saam Tv

मीन

"मन चंगा तो कठौती में गंगा "असा काहीसा दिवस आहे. मन प्रफुल्लीत राहील. आनंद द्विगुणीत होईल. आपले स्वतः ची साथ आज जास्तच प्रिय वाटेल.

Meen | Saam Tv

NEXT: Dog Behavior: ठराविक लोकांना बघुनच कुत्रे का भुंकतात?

dog instincts explained
येथे क्लिक करा