Ashadhi Wari Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari: आषाढी यात्रेवर सीसीटीव्हीची नजर; 29 चौकात कॅमेरे

आषाढी यात्रेवर सीसीटीव्हीची नजर; 29 चौकात कॅमेरे

भरत नागणे

पंढरपूर : पंढरीच्या वारीत यंदा प्रथमच माऊली स्कॉड काम करणार आहे. तर शहरातील गर्दीवर सीसीटिव्हीद्वारे वारीवर पोलिसांचे (Police) लक्ष राहणार आहे. (pandharpur news police wacth CCTV look at Ashadi Yatra Cameras in 29 squares)

दोन वर्षाच्‍या खंडानंतर विठुमाऊलीचे भक्‍त आषाढी वारीला (Ashadhi Wari) यंदा जात आहेत. यामुळे यंदा आषाढी वारीसाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. वारी दरम्यान पंढरपूर (Pandharpur) शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये; यासाठी पोलिसांनी प्रथमच आषाढी वारीमध्ये होणाऱ्या गर्दीमधील हालचालीवर आता लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसविण्यात आले आहेत.

९० कॅमेरे लावले

विठ्ठल मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख २९ चौकात ९० सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मंदिर परिसर, वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग येथे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. संत नामदेव पायरी मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी पुढे सरकवण्यासाठी पहिल्यांदाच माऊली स्कॉड तयार केले आहे. १२ पथकांमध्ये १२० पोलीस कर्मचारी काम करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT