Devotees shocked after worms and fungus were found in laddu prasad at Pandharpur Vitthal Temple; video goes viral. saamtv
महाराष्ट्र

Pandharpur Temple: विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसादाला बुरशी; पाकिटातून निघाल्या अळ्या

Vitthal Temple Pandharpur: पंढरपूर विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसादात अळ्या आणि बुरशी आढळल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून भाविक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

Bharat Jadhav

  • पंढरपूर विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसादात अळ्या आणि बुरशी आढळली.

  • हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे उघड झाला.

  • मंदिर समितीच्या ढिसाळ कारभारावर भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

भारत नांगणे, साम प्रतिनिधी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. विठ्ठल मंदिरात देण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादामध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. या प्रकारामुळे मंदिर समितीच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभार उघडकीस आलाय.

एका व्यक्तीने पोस्ट करत प्रसादातील अळ्या दाखवल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडून अल्पदरामध्ये लाडू प्रसाद दिला जातो. हजारो भाविक हा लाडू विकत घेत असतात. पण याच लाडूच्या प्रसादांमध्ये चक्क आळ्या असल्याचे दिसून आल्या आहेत. या प्रकारामुळे भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रसाद चांगल्या प्रतीचा दिला जात नसल्यानं मंदिर समितीला भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्तीने लाडू दाखवत आहे. त्याने पंढरपूरमधून लाडू घरी आणले होते. प्रसादाचे पाकिट फाडल्यानंतर त्यातील लाडूंना बुरशी लागली होती, तर पाकिटातून अळी निघाली. दरम्यान पंढरपूरमधील हा प्रसाद लाखो भाविक आपल्या घरी नेत असतात. याप्रकरणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रतिक्रिया दिलीय. संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalwar Upay: पैसा अन् सुख समृद्धीसाठी मंगळवारी करा हे उपाय, होईल फायदा

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

SCROLL FOR NEXT