Pandharpur News SAAM TV
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Wedding: डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न; VIDEO

Pandharpur Vitthal-Rukmini Wedding on Vasant Panchami Video: आज वसंत पंचमीच्या मूहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाहसोहळा संपन्न झाला. याची देही याची डोळा असा अनुभव देणारा हा क्षण होता.

Siddhi Hande

विठ्ठल-रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न

वसंती पंचमीला पार पडतो विवाह सोहळा

डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण

भरत नागणे,साम टीव्ही प्रतिनिधी

साक्षात श्रीकृष्णाचं रूप असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा आज पार पडला. दुपारी 12 वाजता विठ्ठल मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने व मोठ्या भक्ती भावाने हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. याची देही याची डोळा असा हा क्षण होता.

विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी "या पंढरपुरात...काय वाजत गाजत...सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं ...' या पारंपारिक लोकगीतावर ठेका धारल्याचे पाहायला मिळाले.

माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी. वसंत ऋतूची चाहूल लागते म्हणून माघ महिन्यातील शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. हाच दिवस.श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. आज याच मुहूर्तावर देवाचा राजेशाही पध्दतीने विवाह सोहळा विठ्ठल मंदिरात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठलाला गुलाल लावून पूजा केली. त्यानंतर दुपारी बारा वाजता विवाह सोहळा संपन्न झाला.

दुपारी बाराच्या सुमाराला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मुर्ती सभा मंडपात आणल्या. डोक्यावर पगडी, अंगी सोवळे कपाळी मुंडावळया असा सजलेला देखणा विठूमाऊली आणि पैठणी, अंलकाराने सजलेली रुक्मिणी माता यांच रूप अनेकजण डोळे भरून पाहत होते. मंत्रोच्चार आणि मंगलाष्टके च्या सुमधूर आवाजात उपस्थितानी अक्षता टाकल्या. अशा सुंदर आणि आनंदी वातावरणात हा सोहळा पार पडला.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संपूर्ण फुलांनी सजले होते. विठ्ठल रुक्मिणी चा विवाह सोहळा याच देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत महिला ग्राहकावर हल्ला, अर्बन कंपनी थेरपिस्टचा व्हिडिओ व्हायरल, धक्कादायक कारण समोर

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांबद्दल आम्ही तासंतास बोलू शकतो- राज ठाकरे

Saree Styling Tips: उंच महिलांनी साडी कशी नेसायची? या स्मार्ट टिप्स करा फॉलो, दिसाल रेखीव अन् सगळ्यात एलिगंट

Thane Water Shutdown News: ठाण्यात मोठी पाणीबाणी; तब्बल १२ दिवस पाणी कपात, कोणत्या भागांना बसणार फटका?

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार|VIDEO

SCROLL FOR NEXT