Vitthal Rukmini Mandir Pandharpur x
महाराष्ट्र

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदीत पूजा? नव्या वादाला सुरुवात? Video

Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिंदीतून पूजा घातली गेल्याचा दावा एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करत केला होता. हे आरोप मंदिर प्रशासनाने फेटाळले आहेत.

Yash Shirke

  • पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदीत पूजा घातल्याचा दावा करण्यात आला.

  • मंदिर प्रशासनाने आरोप फेटाळून लावले आहेत.

  • पूजा फक्त संस्कृत व मराठीतच होत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

Vitthal Rukmini Mandir Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिंदीमध्ये पूजा घातल्याचा दावा करण्यात आला आहे. राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करत हा दावा केला आहे. जवळपास ३० ते ३५ मराठी कुटुंब असताना फक्त एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात राहुल सातपुते यांनी पंढरपूर मंदिर समितीकडे तक्रार दाखल केली आहे. 'या प्रकरणाचा तपास करु तसेच मंदिरात मराठीतूनच पूजा घातली जाईल' असे स्पष्टीकरण पंढरपूर मंदिर समितीकडून देण्यात आले आहे.

तपासानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाने हे आरोप फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सर्व पूजा या संस्कृत आणि मराठी या भाषांमधूनच होत असल्याचे स्पष्टीकरण मंदिर समितीने दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oldest fort in India: भारतातील सर्वात जुना किल्ला कोणता आहे?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले

Mukesh Ambani : अंबानींच्या घरी रोज बनवल्या जातात तब्बल ४००० चपात्या! वाचून व्हाल थक्क

Priya Marathe: प्रिया मराठेचे 'तू तिथे मी' मालिकेतील फोटो पाहिलेत का?

जीएसटीत मोठा बदल! बाईक आणि स्कूटर खरेदीदारांसाठी खुशखबर; दुचाकी स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT