Vitthal Rukmini Mandir  Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News : विठुरायाच्या मंदिराला चांदीचा दरवाजा, ३० किलो चांदीत कोरीव काम, भक्तांनी दिलं दान

Vitthal Rukmini Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा दरवाजा ३० किलो चांदीचा वापर करुन दरवाजा मढवण्यात आला आहे. या कामासाठी तब्बल ३३ लाख ७५ हजार रुपये खर्च आल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

भरत नागणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन काम प्रगतीपथावर आहे. अशातच विठुरायाच्या मंदिराचा दरवाजा चांदीने मढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराची शोभा वाढणार आहे. एका भक्ताने भेट केलेल्या ३० कोटी चांदीचा वापर करुन दरवाजा मढवण्यात आला आहे.

पंढरपूरचा विठोबा हा लाखो भाविकाचा जीव की प्राण आहे. विठोबाच्या पंढरपुरातल्या मंदिराचे रुपडे पालटू लागले आहे. या मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याचदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा लाकडी दरवाजा चांदीने मढवून सजवण्यात आला आहे. यात ३० लाख रुपये किंमतीच्या चांदीचा वापर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

नांदेड येथील विठ्ठल भक्त अरगुलवार कुटुंबाने सुमारे तीस लाख रुपये किंमतीची ३० किलो चांदी पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी भेट दिली होती. त्या चांदीचा वापर करुन मंदिराच्या लाकडी दरवाजा मढवण्यात आला. विठुरायाचा खजिना हा सोने, चांदीच्या अनेक दागिन्यांनी, वस्तूनी समृद्ध आहे. अशात या चांदीच्या दरवाज्यामुळे मंदिराची शोभा आणखी वाढणार आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सागवानी लाकडापासून तयार केलेल्या दोन पाकली दरवाजाला सुमारे ३० किलो चांदी बसवण्यात आली आहे. दरवाजावर चांदीचे अत्यंत सुबक, कोरीव नक्षीकाम देखील करण्यात आले आहे. या कामासाठी जवळपास ३३ लाख ७५ हजार रुपये इतका खर्च आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Money Laundering Probe : ३,००० कोटींच्या प्रकरणात ईडीची धाड, मुंबईसह देशभरात १७ ठिकाणी छापे, ११० कोटी रुपये जप्त

Heavy Rain Mumbai: वसई-विरारसह मीराभाईंदर शहरात पावसाचा धुमाकूळ; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

SCROLL FOR NEXT