Pandharpur Vitthal Mandir: Dilemma over who will perform Kartiki Ekadashi Mahapuja – Ajit Pawar or Eknath Shinde. saam tv
महाराष्ट्र

Pandharpur: विठ्ठल कोणाला पावणार? दादा की शिंदे, पंढरपुरातील महापुजेचा मानकरी कोण?

Pandharpur Vitthal Puja: कार्तिकी एकादशी २०२५ पूर्वी पंढरपूर विठ्ठल मंदिरात पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दोन उपमुख्यमंत्री असल्याने महापूजेचा मान कोणाला मिळणार याचे कोडं पडलंय.

Bharat Jadhav

  • कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते.

  • राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणाला मान मिळणार यावरून गोंधळ.

  • मंदिर समितीची बैठक होऊन निर्णय प्रक्रियेला सुरुवात.

आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. या एकदशीच्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांना महापुजेचा मान दिला जातो. पण राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे का अजित पवार कोणाला पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मिळणार असा प्रश्न मंदिर समितीला पडलाय.

आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. दरम्यान आज पंढरीतील विठ्ठल मंदिर समितीची बैठक झालीय. कार्तिकी एकादशी २ नोव्हेंबर रोजी होत आहे. यावर्षी कार्तिकीच्या पूजेचा मान कोणाला मिळणार हे औत्सुक्याचे असेन. पुजेचा मान देण्यावरून मात्र मंदिर समितीची डोकेदुखी वाढलीय.

कार्तिकी एकादशीच्या या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पण महापुजेचा मान कोणाला मिळेल, यावरून बैठकीतही निर्णय झाला नाहीये. यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता विधी व न्याय विभागाकडे करण्यात येणार असल्याचं ठरलंय. उपमुख्यमंत्री दोन, पण पुजेचा मानकरी कोण? अशी चर्चा सुरू झालाीय.

यंदा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक झाली. त्यामध्ये आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेलाही सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यंदा कार्तिकी सोहळ्यात २६ ऑक्टोबरपासून भाविकांना २४ तास दर्शन व्यवस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Bomb Blast Update: बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ला मोठं यश; उमरसोबत कट आखणाऱ्या i20 कारच्या मालकाला अटक

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये धक्का लागण्याच्या वादातून ओला चालकाला बेदम मारहाण

Indurikar Maharaj : साखरपुड्यापेक्षा मुलीचं लग्न टोलेजंग करणार;ट्रोलिंगनंतर इंदुरीकर महाराज भडकले,VIDEO

Bus Fire : क्षणात सर्व काही घडलं, पिंपरी-चिंचवडमध्ये PMPML बस आगीच्या भक्ष्यस्थानी; राज्यात दिवसभरातील तिसरी घटना

CNG Crisis: मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT