Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Onion Price in Pandharpur: पंढरपुरात कांद्याला उच्चांकी प्रती किलो २५ रूपयांचा भाव

Pandharpur News : पंढरपुरात कांद्याला उच्चांकी प्रती किलो २५ रूपयांचा भाव

भारत नागने

Kanda Niryat News Today:

केन्द्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्कात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याचे (Onion) बाजार भाव पडतील अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, पंढरपूर (Pandharpur) येथील बाजार समितीमध्ये आज कांद्याला उच्चांकी प्रती क्विंटल २ हजार ५०० रूपयांचा भाव मिळाला आहे. ‌(Latest Marathi News)

कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ करण्यात आलि आहे. या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. कांद्याचे भाव कमी होतील या भितीने आज (Nashik) नाशिक, मनमाड, लासलगाव येथील बाजार समित्यांमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आंदोलन करत बाजार बंद ठेवले आहेत. तथापी पंढरपूर येथील बाजार समितीमध्ये आजा कांद्याची जवळपास ८०० क्विंटल आवक झाली.

कमी प्रतीच्या कांद्याला १२ रूपये तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला उच्चांकी २५ रूपये भाव मिळाला आहे. दत्तात्रय शेवतकर या शेतकर्याच्या ८ क्विंटल कांद्याला २५ रूपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT