Rahuri Bajar Samiti: ४० टक्के निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात राहुरी बाजार समिती बंद

Rahuri News : ४० टक्के निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात राहुरी बाजार समिती बंद
Rahuri Bajar Samiti
Rahuri Bajar SamitiSaam tv
Published On

सचिन बनसोडे

राहुरी (अहमदनगर) : २४१० रुपये दराने कांदा खरेदी म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभुल करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी (Farmer) संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात (Rahuri) शुल्क ४० टक्के वाढविले आहे. या विरोधात आज राहुरी बाजार समितीमधील लिलाव बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. (Breaking Marathi News)

Rahuri Bajar Samiti
Jalgaon News: दुर्दैवी..श्रावण सोमवारी दर्शनाला गेले; रामेश्वरच्या त्रिवेणी संगमावर तिघा भावांचा बुडून मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीत आज कांदा लिलाव बंद ठेवत व्यापा-यांनीही शेतक-यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात असून केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.  

Rahuri Bajar Samiti
Online Game: ऑनलाइन रमीचा नाद; नोकराने घरातून केली ३८ लाखची चोरी

केंद्र सरकार २४१० रुपये दराने महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा (Onion) खरेदी करणार असून नाशिक, अहमदनगरमध्ये विशेष खरेदी केंद्र उभारणार येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या कांद्याला ४०० ते ५०० रुपये दर मिळत असताना सरकार झोपले होते का? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com