pandharpur Shocking news Saam tv
महाराष्ट्र

Shocking : राजा-राणीचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला; शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू

pandharpur Shocking news : पंढरपुरात शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने लोंढे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

भारत नागणे

सोलापुरातील पंढरपूरमधील कोर्टी गावात शेततळ्यात बुडून पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू

मृत्यू पावलेले तिघे लोंढे कुटुंबातील सदस्य

कुटुंब मूळचे मंगळवेढा येथील असल्याची माहिती हाती आली आहे

तिघांच्या मृत्यूने गावात आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली

सोलापुरातील पंढरपुरात सोमवारी भीषण दुर्घटना घडली आहे. पंढरपुरातील शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावातील घटना घडली आहे. तिघांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या पंढरपुरातील कोर्टी गावातील लोंढे कुटुंबासोबत भयंकर घटना घडली.कोर्टीत शेततळ्यात बुडून लोंढे पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला. विजय राजकुमार लोंढे (वय 30), प्रियांका विजय लोंढे (वय 28), प्रज्वल विजय लोंढे (वय 5) असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी आहेत.

धुळ्यात दोन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू

धुळ्यात साक्री तालुक्यातील गणेशपुर दुर्घटनेतील विहिरीत बुडालेल्या दुसऱ्या चिमुकलीचा मृतदेह शोधण्यास तब्बल 24 तास उलटल्यानंतर तपास यंत्रणेला यश मिळालं. कांद्याने भरलेला ट्रॅक्टर विहिरीत बुडून दुर्घटना झाली होती.

या दुर्घटनेत दोन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक चिमुकली या दुर्घटनेमध्ये बचावली आहे. या दुर्घटनेमध्ये दोघा चिमुकलींचा मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मीरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात मध्यरात्री तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा

वाघाचा बाईकस्वारावर हल्ला? शेपटीवरून बाईक नेणं पडलं महागात?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! कधीपासून लागू होणार आठवा वेतन आयोग? सरकारनं दिली नेमकी माहिती

महाराष्ट्राला विरोधी पक्षनेताच नाही, विरोधी पक्षनेतेपदाविनाच चालणार अधिवेशन?

फुगा फुटला, जीव गेला, मुलांच्या हातात फुगा बॉम्ब

SCROLL FOR NEXT