Kesar Mango Farm Saam tv
महाराष्ट्र

Kesar Mango Farm : खडकाळ माळरानावर फुलवली केशर आंब्याची बाग; सांगोल्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल

Pandharpur News : वेगळा प्रयोग करण्याचे सोमनाथने ठरवत कमी पाण्यात आणि उपलब्ध साधनांना अत्यंत कुशलतेने वापर करुन सोमनाथ यांनी २०२० साली पाच एकर खडकाळ माळरानावर केशर आंब्याची लागवड केली

भारत नागणे

पंढरपूर : दुष्काळी भाग शिवाय खडकाळ जमीन. यात काय पिकवायचे हा प्रश्न कायमचा आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील सोमनाथ नरळे या तरुण शेतकऱ्याने अत्यंत कमी पाण्यात खडकाळ माळरानावर केशर आंब्याची बाग फुलवली आहे. यातून यावर्षी पाच एकर आंबा बागेतून जवळपास १५ टन उत्पादन अपेक्षीत आहे. सध्या दोन टन आंब्याची पुण्याच्या बाजारपेठेत तीनशे रुपये किलो दराने विक्री केली आहे. 

पंढरपूरच्या सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. शिवाय या भागात सुपीक अशी जमीन फार कमी आहे. यामुळे पिकांचे उत्पादन चांगले येत नसते. मात्र पदवीधर असलेल्या सोमनाथकडे वडीलोपार्जित असलेल्या सहा एकर शेती आहे. शेतीला शाश्वत पाणी नसल्याने पावसाळी हंगामात पिके घेतली जायची. यामुळे वेगळा प्रयोग करण्याचे सोमनाथने ठरविले. कमी पाण्यात आणि उपलब्ध साधनांना अत्यंत कुशलतेने वापर करुन सोमनाथ यांनी २०२० साली पाच एकर खडकाळ माळरानावर केशर आंब्याची लागवड केली. 

ठिबक सिंचनाद्वारे जोपासली बाग 

लक्ष्मीनगर भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पावसाळ्याच्या पाण्यावर शेती केली जाते. वेगळा प्रयोग म्हणून सोमानथ यांनी धाडसाने आंबा फळ बागेची लागवड केली आहे. ठिंबक सिंचनाद्वारे कमी पाण्यात बाग जोपासली आहे. मोठ्या कष्टाने जोपासलेल्या बागेने यंदा सोमनाथ यांना लखपती केले आहे. सध्या आंब्याची काढणी सुरु झाली आहे. लागवडीपासून तीन वर्षानंतर फळधारणा सुरु झाली. यावर्षी पोषक हवामान आणि बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे फळांची संख्या वाढली आहे. यामुळे यंदाच्या हंगामात किमान १५ टन उत्पादन अपेक्षित आहे. 

दोन टन आंब्यांची विक्री 

आतापर्यंत दोन टन आंब्याची पुणे येथील बाजारात तीनशे रुपये प्रती किलो दराने विक्री केली आहे. त्यातून सहा लाख रुपये मिळाले आहेत. आणखी बागेत सुमारे १३ टन आंबा शिल्लक आहे. सरासरी दोनशे रुपये प्रती किलो भाव मिळाला; तर आणखी २६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. पाच एकर बागेसाठी खते, किटक नाशक फवारणी, मजूर, तोडणी आणि वाहतूकीसाठी तीन ते साडे तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. खर्च वजा जाता आंबा पिकातून किमान ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळेल; असा विश्वास सोमनाथ नरळे यांनी व्यक्त केला आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: एकनाथ शिंदे तुझ्या शिवसेनेचा बाप अमित शहा आणि नरेंद्र मोदी... तू दोन बापाचा, संजय राऊतांची जहरी टीका|VIDEO

Diwali Cars Offers 2025: Car खरेदी करण्याची सुवर्णसंधी! नवीन कार खरेदी करा अन् ३ लाखांपर्यंत बचत करा

Digital Arrest Crime : व्हिडीओ कॉल उचला अन् ५८ कोटी गमावले, मुंबईतील व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत लुबाडलं

Pune : प्रवाशांच्या अन् चालकाच्या जीवाशी खेळ, पुण्यात दरवाजा नसलेली लालपरी धावली; VIDEO व्हायरल

Fact Check : अजित आगरकरची हक्कालपट्टी? निवड समितीच्या अध्यक्षपदी रवी शास्त्रींची नियुक्ती होणार?

SCROLL FOR NEXT