Liquor Ban : मतदान घेत दारूबंदी तरीही गावात सर्रास दारू विक्री; ग्रामसभा घेत पुन्हा केला ठराव

Nandurbar News: महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेत यासाठी पाच महिन्यापूर्वी गावात महिलांनी दारूबंदीसाठी मतदान घेतले. यानंतर गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला
Liquor Ban Nandurbar
Liquor BanSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: असलोद गावातील महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदीसाठी मतदान घेऊन गावात दारूबंदी केली होती. मात्र गावात दारू विक्री करणाऱ्या अवैध्य व्यवसायिकांना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दलाचे पाठबळ असल्याने मतदान झाल्यानंतर ही दारूबंदी न झाल्याने गावकरी आक्रमक झाले आहे. यामुळे विशेष ग्रामसभा घेत गावात दारूबंदीचा ठराव करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील असलोद गावात सर्रासपणे दारू विक्री केली जात होती. यामुळे गावातील महिला त्रस्त झाल्या होत्या. महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेत यासाठी पाच महिन्यापूर्वी गावात महिलांनी दारूबंदीसाठी मतदान घेतले. यानंतर गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गावातील दारूबंदी न होता गावात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याचे समोर आले आहे. 

Liquor Ban Nandurbar
Dombivali Crime : रेल्वे प्रवासात महिलांशी साधायची जवळीक; संधी साधत करायची हात साफ, महिला चोर पोलिसांच्या ताब्यात

प्रशासनाच्या आशीर्वादाने दारू विक्रीचा आरोप 

गावात कुठे कुठे दारू विक्री होते, याची माहिती पोलीस प्रशासनाला असून पोलीस त्याच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप गावाच्या सरपंचांनी केला आहे. तर गावातील दारूबंदी करण्यात यावी आणि दारू विक्रीसाठी सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी; या मागणीसाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत चर्चा करण्यात येऊन दारूबंदीचा विशेष ठराव पास करण्यात आला आहे. 

Liquor Ban Nandurbar
Sambhajinagar Crime : शेतकऱ्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा; बेदम मारहाण करत साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

ग्रामसभेच्या ठरावाला महत्त्व नाही का?

एकीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांना गावातील दारूबंदी दिसत नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे दारू विक्री होत असली तरी वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात. याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. सरकार ग्रामसभेच्या ठरावाला विशेष महत्व देत असताना नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी ग्रामसभेच्या ठरावाला कचऱ्याचा डबा का दाखवतात? असा प्रश्नही आता आदिवासी भागातील नागरिक विचारताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com