Sangola News Saam tv
महाराष्ट्र

Sangola News : इमारतीला आग लागून भीषण स्फोट; एकाच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Pandharpur News : सांगोला तालुक्यातील महूद येथे पहाटेच्या सुमारास एका इमारतीला अचानक आग लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे टायरचे दुकान होते आणि पहाटे दोनच्या सुमारास या इमारतीला आग लागली.

भारत नागणे

पंढरपूर : सांगोला तालुक्यातील महूद येथे आज पहाटे एका इमारतीला आग लागली. आग लागल्यानंतर (Pandharpur) मोठा स्फोट झाल्याने इमारतीचे फार मोठे नुकसान झाले. या स्फोटात इमारतीचे शटर व पत्रे उडून दूर पडली आहेत. तसेच यात एका जणाचा मृत्यू (Death) झाला असून अन्य एकजण जखमी झाला आहे. (Live Marathi News)

सांगोला (Sangola) तालुक्यातील महूद येथे पहाटेच्या सुमारास एका इमारतीला अचानक (Fire) आग लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे टायरचे दुकान होते आणि पहाटे दोनच्या सुमारास या इमारतीला आग लागली. या आग लागल्यावर स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. स्फोट गॅस सिलेंडरचा असल्या संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत अतुल बाड या तरुणाचा मृत्यू झाला असून दीपक कुठे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. आग लागल्यानंतर झालेला स्फोट इतका भयानक होता, कि इमारतीचे शटर, पत्रे उडून दूरवर पडल्याचे चित्र होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्फोटाचे गूढ

आगीनंतर झालेला स्फोट नेमका कसला होता याबाबत अजून तपास आणि पंचनामे सुरु असल्याने स्फोटाचे नेमके कारण जखमींची चौकशी केल्यावर समोर येईल; असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र एवढी तीव्रता असणारा स्फोट गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या ठिकाणी झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. या स्फोटात एकाला प्राण गमवावा लागला असून एक गंभीर जखमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

थांबायचं नाही! ठाकरे बंधूंना भाजपकडून जबरदस्त धक्का, बड्या नेत्यांनी धरली भाजपची वाट

५ महिला आणि २ बालके सहस्रकुंड धबधब्यात अडकले; पाहा थरारक VIDEO

Shocking : प्रेमाचा भयंकर शेवट! जंगलात सापडला तरुण-तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, हत्या की आत्महत्या?

Dream Astrology: स्वप्नात उडताना पाहणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय मिळतात संकेत?

Maharashtra Live News Update : माजी आमदार दिलीप माने यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ऑफर

SCROLL FOR NEXT