Sharad Pawar group Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Politics: पंढरपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, माजी नगरसेवकांनी सोडली साथ; शरद पवार गटाची ताकद वाढली

Sharad Pawar Group: पंढरपूरमध्ये काँग्रेसला आणि भगीरथ भालके यांना मोठा धक्का बसला आहे. या माजी नगरसेवकांच्या निर्णयामुळे पंढरपुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.

Priya More

पंढरपूरमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान एकापाठोपाठ एक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पंढरपूरमध्ये काँग्रेसच्या ६ माजी नगरसेवकांनी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांची साथ सोडली. त्यामुळे पंढरपूरमध्ये काँग्रेसला आणि भगीरथ भालके यांना मोठा धक्का बसला आहे. या माजी नगरसेवकांच्या निर्णयामुळे पंढरपुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पंढरपूर शहरातील ६ माजी नगरसेवकांनी काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सहा माजी नगरसेवकांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांची ताकद वाढली आहे.

अमोल कोल्हे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की, 'अजित पवार यांना जनतेचा मूड लक्षात आला आहे. त्यामुळेच त्यांना बारामती मतदारसंघात गावोगावी जाऊन प्रचार करण्याची वेळ आली.', असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. 'चुकीला माफी होऊ शकते. मात्र गद्दारीला माफी होऊ शकत नाही. ३५ वर्षे राजकारणात असलेल्या अजित पवारांना भावनिक आवाहन करण्याची वेळ आली आहे. जनतेचा मुड महाविकास आघाडी सत्तेत आणायची असा असल्याने ते गावोगावी फिरत आहेत.', असा टोला अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला.

तसंच, 'पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अनिल सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दोन पक्षाकडे उमेदवारी मागणारे हे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आहेत. प्रत्येक वेळी पक्ष बदलणाऱ्या दल बदलूना पंढरपूर मंगळवेढामधील मतदार स्वीकारणार नाहीत.' असा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT