Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur : कुस्ती क्षेत्रात खळबळ! कोल्हापुरात पैलवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

कोल्हापुरातील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा दुर्देवी मृत्यू झाला.

भारत नागणे

Pandharpur News : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापुरातील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा दुर्देवी मृत्यू झाला. मारूती सुरवसे (वय 23 वर्ष) असं मृत झालेल्या पैलवानाचं नाव असून तो पंढरपूरच्या (Pandharpur) वाखरी येथील रहिवाशी आहे. (Kolhapur News Today)

मारूती याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे. मूळ वाखरी येथील असलेला मारूती हा गेल्या काही वर्षांपासून कुस्तीचा सराव करण्यासाठी कोल्हापुरातील तालमीत दाखल झाला होता.

सोमवारी (3 ऑक्टोबर) रात्री मारूतीने नेहमीप्रमाणे तालमीत कुस्तीचा सराव केला. त्यानंतर तो अंघोळ करण्यासाठी गेला असताना, त्याच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मारूती याची प्राणज्योत मालवली.

या घटनेनं कुस्ती क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मारूतीचे वडील वाखरीत शेती करतात. मारूतीला लहानपणा पासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी त्याला. कोल्हापूर येथील तालमीत कुस्तीच्या सरावासाठी पाठवण्यात आले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT